kolhapur news  Saam tv
महाराष्ट्र

देव तारी त्याला कोण मारी...! गॅलरीतून पडलेला सव्वा वर्षांचा चिमुकला चमत्कारिकरीत्या बचावला, थरार कॅमेऱ्यात कैद

Kolhapur viral video : गॅलरीतून पडलेला सव्वा वर्षांचा चिमुकला चमत्कारित्या बचावल्याचे समोर आलं आहे. हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Vishal Gangurde

सव्वा वर्षांचा चिमुकला गॅलरीतून कोसळला

श्रीवंश प्रविण लव्हटे असं बचावलेल्या चिमुकल्याचं नाव

कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील घटना

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

कोल्हापूर : देवतारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं आलायं. केवळ नशीब बल्लवत्तर म्हणून सव्वा वर्षाचा श्रीवंश प्रविण लव्हटे गॅलरीतून पडून देखील चमत्कारिकरीत्या बचावलायं.

नवसाच्या श्रीवंशला कुटूंबाने फुलासारखा जपलायं.. पण रविवारी लव्हटे कुटूंबासाठी काळ बनून आलेली वेळ, नशिब बल्लवत्तर म्हणूनच माघारी परतल्याने लव्हटे कुंटुबाने देवाचे अक्षरशः आभार मानलेत.. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.. कोतोली येथील प्रविण पांडूरंग लव्हटे यांचा सव्वा वर्षाचा श्रीवंश हा एकुलता मुलगा घराच्या गॅलरीत खेळत होता..बहिणीची नजर चुकवून खाली डोकावल्याने तो गॅलरीतून खाली कोसळला.

ही घटना प्रत्यक्षपणे पहाणार्‍यांचा यावेळी अक्षरशा थरकापचं उडाला. दैव बलवत्तर म्हणून श्रीवंशच्या डोक्याला किरकोळ दुखापत वगळता तो सुखरूप बचावल्याने देवतारी त्याला कोण मारी म्हणीचा नागरिकांना प्रत्यय आला.

अचानक घडलेल्या प्रसंगाने आई जयश्री अक्षरशा भांबावून गेली.त्यामुळे घरच्यांनी बाळाला घेऊन रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात श्रीवंशचे एक्स-रे आणि स्कॅनिंगसह सर्व तपासण्या करण्यात आल्या. बाळाची तब्बेत चांगली असल्याचे डाॅक्टरांनी सांगताच आई-वडिलांसह सर्व नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी तराळले.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

गॅलरीतून सव्वा वर्षांचा चिमुकला अचानक कोसळला. श्रीवंश नावाचा हा चिमुकला गॅलरीतून कोसळल्याने एकच खळबळ उडाल्याचं दिसलं. यावेळी त्याचा डोक्याला किरकोळ दुखापत झाली. श्रीवंश खाली पडल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभा असलेला व्यक्ती मदतीला धावून आला. या व्यक्तीने लगेच श्रीवंशला जमिनीवरून उचललं. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेलं. श्रीवंशची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भयंकर! ७ वर्षांची मुलगी शेजारी झोपलेली असतानाच पत्नीचा गळा चिरून खून; नंतर पतीने मेट्रोसमोर उडी मारून संपवलं आयुष्य

Maharashtra News Live Update: गुजरातकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा चाळीसगावात अपघात

Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

एकनाथ शिंदेंच्या आमदाराने कंत्राटदाराकडून ४० लाखांची लाच घेतली? व्हिडीओने महाराष्ट्रात खळबळ

Maharashtra Rain : वादळी पावसाचा इशारा; विदर्भ आणि कोकणात 'येलो-ऑरेंज' अलर्ट, जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT