kolhapur fire  saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Fire : कोल्हापूरच्या शिवाजी पार्कातील झोपडपट्टीला भीषण आग; २० घरं जळून खाक

कोल्हापूरच्या शिवाजी पार्क येथील झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगांवकर

Kolhapur Fire : कोल्हापूर येथील शिवाजी पार्क भागातून आगीचं वृत्त हाती आलं आहे. कोल्हापूरच्या शिवाजी पार्क येथील झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत वीस घरांना आग लागली आहे. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी पोचले आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील (Kolhapur) शिवाजी पार्क येथील झोपडपट्टीला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत परिसरातील २० घरे जळून खाक झाली आहेत. या आगीमुळे अनेक कुटुंबाच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान खबर मिळाल्याने घटनास्थळी पोचले. त्यानंतर अथक परिश्रमानंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

नेमकी आग कशामुळे लागली?

कोल्हापूरच्या शिवाजी पार्कातील झोपडपट्टीत आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. त्यामुळे झोपड्यांना लागलेली आग विझविण्यासाठी नागरिकांची एकच धावाधाव झाली. अग्नीशमन दलाच्या जवानासहित नागिरकांनी देखील आग विझविण्यासाठी मदत केली.

या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनाी सिलेंडरचा स्फोट झाल्याचा आवाज ऐकला, त्यानंतर भीषण आग लागली असं नागरिक सांगत आहे. या आगीत तांब्यापासून बनवणाऱ्या साधनसामुग्री वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भीषण आगीत झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: नाशिक, बुलढाण्यातील ZP च्या कर्मचाऱ्यांनी लाटले लाडकीचे पैसे, २ पुरुषांचाही समावेश, धक्कादायक माहिती समोर

Amruta Deshmukh : मालिकांमध्ये हिरो-हिरोईनचे कास्टिंग कसं होते? 'बिग बॉस' अभिनेत्रीनं सांगितलं कटू सत्य

Mumbai Goa highway : मुंबई-गोवा महामार्गावरील आजपासून अवजड वाहतूक बंद, ३ टप्प्यात निर्बंध, वाचा सविस्तर

Shaniwar che Upay: शनिवारच्या दिवशी करा फक्त 'ही' ४ कामं; शनिदेवाच्या कृपेने संपत्ती वाढण्यास होणार मदत

Maharashtra Live News Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात

SCROLL FOR NEXT