Kolhapur Saloon
Kolhapur Saloon Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Saloon: देशप्रेमाचं अनोखं उदाहरण, कोल्हापुरातील या सलुनमध्ये जवानांना मोफत, माजी सैनिकानां 50% दरात सेवा

संभाजी थोरात साम टीव्ही कोल्हापूर

कोल्हापूर : देशप्रेम कंस व्यक्त करायचं असा प्रश्न अनेकजणासमोर असतो. मात्र, कोल्हापूरमधील योगीराज माटे या तरुणाने देशाबद्दलच ऋण आगळ्यापध्दतीने व्यक्त केलंय. योगीराजने आपल्या सलूनमध्ये सध्या सेवेत असणाऱ्या जवानांना मोफत सेवा तर माजी सैनिकानां 50% दरात सेवा देत आहे. गेल्या तीन वर्षांपासून कोणताही गावावाज न करता हा उपक्रम सुरू आहे (Kolhapur Saloon of Yogiraj Where Javan Get Free Service And Former Javan Get 50 percent Discount).

देशप्रेम म्हणून अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. कोल्हापूर (Kolhapur) च्या जाधववाडी येथे मल्हार सलूनचा मालक योगीराज माटे याने देशासाठी सीमेवर जीवाची बाजी लावणाऱ्या जवानांसाठी काहीतरी करायचं या भावनेतून आपल्या सलून (Saloon) मध्ये सध्या सेवेत असणाऱ्या जवानांना (Javan) मोफत सेवा देण्यास सुरुवात केली.

तर माजी सैनिकांना 50 टक्के दरात सेवा देण्यात येत आहे. पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर अनेक जणांनी वेगवेगळ्या प्रकारे भावना व्यक्त केल्या तर योगीराजने अशाप्रकारे आपलं कर्तव्य पार पाडले.

गेल्या तीन वर्षात शेकडो आजी-माजी सैनिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. योगीराजने राबवलेल्या उपक्रमाचे ते कौतुक ही करतात.

योगीराजचे पणजोबा बळवंतराव माटे हे स्वातंत्र्यसैनिक होते, त्यांच्यापासून माटे कुटुंबीय अशाप्रकारे आपलं देश प्रेम व्यक्त करतात योगीराज ने राबवलेला उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमध्ये नवा ट्विस्ट! रमेश जाधव यांच्या उमेदवारीमागे ठाकरेंची राजकीय खेळी की आणखी काही?

Avinash Jadhav : अविनाश जाधवांची पोलिसांसमोर दादागिरी; सराफा व्यापाऱ्याच्या मुलाला मारहाण, व्हिडिओ आला समोर

Sangli Helicopter Emergency Landing | हेलिकॉप्टरचं ईमरजन्सी लँण्डिंग...

Health Tips: 'या' पदार्थंसोबत चुकूनही लिंबाचे सेवन करू नये

Vrat Recipe: व्रतासाठी 'या' सोप्या पद्धतीने बनवा खुसखुशीत थालीपीठ

SCROLL FOR NEXT