Kolhapur Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur: दाजीपूर अभयारण्य ३१ ते १ जानेवारीपर्यंत बंद; नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Kolhapur Dajipur Wildlife Sanctuary Close: कोल्हापूरमधील दाजीपूर अभयारण्य हे दोन दिवस बंद राहणार आहे. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीपर्यंत दाजीपूर अभयारण्य बंद असणार आहे.

Siddhi Hande

नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचा प्लान करतात. मित्रमैत्रिणींसोबत पार्टीचा प्लान करतात. जर तुम्ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापूरच्या दाजीपूर अभयारण्याचा भेट देण्याचा विचार करत असाल तर हे अभयारण्य दोन दिवस बंद असणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील गव्यासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य ३१ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत बंद असणार आहे. दोन दिवसांसाठी पर्यटक आणि अभ्यासकांना दाजीपूर अभयारण्यात प्रवेश बंद राहणार आहे.

राधानगरी तालुक्यातील हे दाजीपूर अभयारण्य गवरेडा आणि इतर प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी महाराष्ट्रातून हजारो पर्यटक येथे येत असतात. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वन्यजीव विभागाने दोन दिवसासाठी अभ्यारण्य बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या काळात अभयारण्य क्षेत्रात विनापरवाना प्रवेश, मद्य पिणे, गाणी वाजवणे, प्लास्टिक कचरा करणे किंवा हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर वन्यजीव कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात पर्यटकांनी येऊ नये, असे आवाहन वन्यजीव विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे जर नववर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही कोल्हापूरला जाण्याचा प्लान करत असाल तर वेळीच थांबा

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण फिरायला जातात. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोवा, लोणावळा अशा ठिकाणी तरुणाई जाते. परंतु नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून अनेक ठिकाणी पर्टकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कुठेही फिरायला जाण्याआधी ती जागा पर्यटकांसाठी खुली आहे की नाही हे एकदा चेक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shilpa Shinde: 'अंगूरी भाभी' जेलमध्ये जाणार? प्रोड्यूसरवर हरेसमेंटचे खोटे आरोप भोवले, अभिनेत्रीच्या अटकेची मागणी

Pune Hospital: पुण्यातील आरोग्य विभाग 'व्हेंटिलेटर'वर, पालिका रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा; धक्कादायक आकडेवारी समोर

एक नंबरचे स्वार्थी आणि ढोंगी असतात 'ही' माणसं! आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 'या' २ सवयींवरून ओळखा

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे दमदार आगमन

Mumbai Crime : मुंबईत भयंकर घडलं! आईच्या बॉयफ्रेंडचं टाळकं सटकलं, अमानुष मारहाणीत ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT