Vande Bharat Train Saam Tv
महाराष्ट्र

Vande Bharat Train : कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचं तिकीट किती? केव्हा सुटणार, घ्या जाणून...

Kolhapur Pune Vande Bharat Train Tickets : कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. या एक्सप्रेसचं तिकीट काय आहे, हे आपण सविस्तर पाहू या.

Rohini Gudaghe

रणजित माजगांवकर, साम टीव्ही कोल्हापूर

कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेससंदर्भात एक मोठं अपडेट समोर आलंय. कोल्हापूर-पुणे वंदे भारत सोमवारपासून सुरू होणार आहे. आठवड्यातून तीन वेळा धावणाऱ्या कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा सोमवारी शुभारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी वंदे भारत एक्सप्रेची चाचणी घेण्यात आली. वंदे भारत आता कोल्हापूर-पुणे मार्गावर धावण्यासाठी सज्ज झालीय.

कोल्हापूर - पुणे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसला नेमका किती वेळ लागतो ? या मार्गावर अन्य काही अडथळे आहेत का ? याची चाचणी घेण्यात आज घेण्यात आलीय. वंदे भारत आठवड्यातून तीन वेळा कोल्हापूर - पुणे या मार्गावर (Kolhapur Pune Vande Bharat Train ) धावणार आहे. मागील आठवड्यात पुणे ते हुबळी वंदे भारतला कोल्हापूर थांबा प्रस्तावित झाला होता. त्यानंतर वाद वाढला होता.

कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस

सोमवारी रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना कोल्हापूर रेल्वे स्थानकावर या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. कोल्हापूर - पुणे वंदे भारत दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी कोल्हापूर स्थानकातून सकाळी सव्वा आठ वाजता सुटेल आणि दुपारी दीड वाजता पुण्यात (Vande Bharat Train ) पोहोचेल. पुण्याहून दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी दुपारी सव्वा दोन वाजता ही गाडी सुटेल आणि सायंकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी ती कोल्हापुर स्थानकात दाखल होईल.

वंदे भारत एक्सप्रेस तिकीट किती?

ही एक्सप्रेस मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा या स्थानकावर थांबणार आहे. कोल्हापूर पुणे या प्रवासाचे दर चेअर कारसाठी १ हजार १६० रुपये आकारण्यात (Vande Bharat Train Tickets) येईल, तर एक्झिक्यूटिव्हसाठी २ हजार ५ रुपये आकारण्यात येणार आहेत. वंदे भारत कोल्हापूर ते पुणे मार्गावर १६ सप्टेंबरपासून धावणार आहे. प्रदीर्घ संघर्षानंतर कोल्हापूरकरांसाठी गुडन्यूज आहे. त्यांची वंदे भारतची मागणी पूर्ण झालीय. दोन दिवसानंतर वंदे भारत आता प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT