Ganeshotsav Kolhapur News Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur: नदीत गणेशमूर्ती विसर्जनास विरोध; हिंदुत्ववादी संघटना आणि प्रशासनामधील वाद चिघळला

वाहत्या पाण्यातच गणेश मूर्ती विसर्जन करणे उचित असल्याची हिंदुत्ववाद्यांची भूमिका.

संभाजी थोरात, कोल्हापूर

कोल्हापूर: राज्यभरात गणेशोत्सव (Ganeshotsav) उत्सहात पार पडत आहे. गणपती बाप्पांच्या आगमनानंतर आता गणपती विसर्जनची लगबग सुरु आहे. काही ठिकाणी दीड दिवसाचा तर काही ठिकाणी पाच दिवसांनंतर गणपती विसर्जन केलं जातं.

याच पार्श्वभूमीवर शहरांमध्ये प्रसासनाकडून कृत्रीम तलावांची निर्मिती करुन त्या ठिकाणी गणेश मूर्तीचे विसर्जन करावं असं आवाहन केलं जात आहे. नागरिक देखील आपल्याला सोयीस्कर असेल अशा ठिकाणी लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करत आहेत.

मात्र इचलकरंजीमध्ये (Ichalkaranji) गणेश मूर्ती विसर्जनावरुन जिल्हाधिकारी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळतं आहे. पंचगंगा नदीत (Panchganga River) गणशे मूर्तींचं विसर्जन करता येणार नाही, अशी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी भूमिका घेतली आहे.

पाहा व्हिडीओ -

शिवाय विसर्जनासाठी शेततळ्याचे निर्मिती केली असून या तळ्यांमध्येच गणेश मूर्तीचे विसर्जन करावं, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती आणि त्यांच्या रंगामुळे पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचं कारण देत जिल्हाधिकाऱ्यांनी पंचगंगा नदीत गणशे मूर्तींचं विसर्जन करु नये अशी भूमिका घेतली आहे.

तर दुसरीकडे इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवडे यांनी पंचगंगा नदीमध्येच गणेश मूर्तींचे विसर्जन करणार असून वाहत्या पाण्यातच गणेश मूर्ती विसर्जन करणे उचित असल्याचं म्हटलं आहे. आवडे यांच्या भूमिकेला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी देखील समर्थन दिलं आहे.

मात्र, विनाकारण चुकीच्या संकल्पना पसरवू नका, असं जिल्हाधिकारी रेखावर यांनी नदीत मुर्ती विसर्जन करण्यावर ठाम असणाऱ्यांना सांगितलं आहे. त्यामुळे आता हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची भूमिका आणि आवाडेच्या भूमिकेमुळे प्रशासन आणि आवाडे यांच्यामध्ये वाद झाला असून आता हा वाद आणखी चिघळणार की काही मध्यम मार्ग निघणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Cut Alert : कल्याण-डोंबिवलीकरांनो पाणी जपून वापरा! मंगळवारी नळाला थेंबही पाणी येणार नाही; 'या' भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

Maharashtra News Live Update: पुणे पदवीधर मतदारसंघात ४०.६० टक्के, तर शिक्षक मतदारसंघात ५७.८९ टक्के मतदान

Black Tongue: जीभ काळी का पडते? तज्ज्ञांनी सांगितलं खरं कारण

Menopause Symptoms: महिलांच्या शरीरात वयाच्या ३० वर्षांनंतर होतात हे मोठे बदल; काय आहे कारण मेनोपॉज की दुसरं काही?

Gold Rate Today: दिवाळीपूर्वी सोन्या- चांदीच्या दरात मोठी घट, 24 कॅरेट सोन्याचा भाव किती? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT