Chandrashekhar Bawankule, Kolhapur News Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur News : पत्रकारांना चहा द्या, ढाब्यावर न्या म्हणणा-या बावनकुळेंना कोल्हापूरी पायताण देणार : प्रेस क्लबचा निर्णय

journalist tea marathi news : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावकुळेंच्या वक्तव्याचा निषेध नाेंदविण्यात आला.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Chandrashekhar Bawankule Audio Clip Viral : पत्रकारांना चहा द्या, त्यांना ढाब्यावर न्या... असे वक्तव्य करणा-या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज कोल्हापुरात कोल्हापूर प्रेस क्लबच्या (kolhapur press club) वतीने निषेध करण्यात आला. (Maharashtra News)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधात बातम्या न देण्यासाठी पत्रकारांना ढाब्यावर न्या.. असा सल्ला एका बैठकीत कार्यकर्ते, पदाधिका-यांना दिला. त्याची कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.

बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी तीव्र शब्दांत टीका केली. सुळे म्हणतात भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌.

दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा काेल्हापूर प्रेस क्लबने निषेध नाेंदविला. प्रेस क्लबच्या पदाधिका-यांनी व सदस्यांनी पुढच्या आठवड्यात बावनकुळेंचा कोल्हापूर दौरा आहे. यावेळी त्यांना कोल्हापुरी पायताण देऊन निषेध नोंदवण्यात येईल असे स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT