A. Y Patil Resign From NCP: Saamtv
महाराष्ट्र

Kolhapur News: कोल्हापूरमध्ये अजित पवार गटाला खिंडार! प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील यांचा राजीनामा; 'मविआ' कडून विधानसभा लढणार?

A. Y Patil Resign From NCP: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला कोल्हापूरमध्ये मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, कोल्हापूर|ता. २२ ऑगस्ट २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला कोल्हापूरमध्ये मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक आनंदराव यशवंतराव तथा ए. वाय. पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

कोल्हापूरमध्ये अजित पवार गटाला धक्का

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकीकडे विधानसभेच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने कंबर कसली आहे. स्वतः अजित पवार निवडणुकासाठी मोर्चेबांधणी करत असून जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. अशातच कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे.

ए. वाय पाटील यांचा तडकाफडकी राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि केडीसीसी बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे त्यांनी राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा पाठवला आहे.

मविआमधून विधानसभा लढवणार?

ए. वाय पाटील यांनी पाठवलेल्या राजीनाम्यात वैयक्तिक अडचणींचे कारण दिले असले तरी ते महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. ए वाय पाटील हे राधानगरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी कडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभेआधी ते मविआमध्ये जाऊ शकतात. दरम्यान, अजित पवार गटाला विधानसभेआधी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

SCROLL FOR NEXT