Kolhapur Politics 
महाराष्ट्र

Kolhapur Politics: कोल्हापुरात एकनाथ शिंदेंचा काँग्रेस-भाजप आणि ताराराणी आघाडीला धक्का; २ माजी महापौरांसह २० नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Kolhapur Politics: शारंगधर देशमुखांनी सतेज पाटील यांची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर कोल्हापुरात एकनाथ शिंदेंची चांगलीच ताकद वाढलीय.

Bharat Jadhav

गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरवर लक्ष केंद्रीत केलं आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेने अनेक मोठ्या नेत्यांना गळाला लावलंय. एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात एकाच वेळी काँग्रेसचे सतेज पाटील, भाजप आणि ताराराणी आघाडीला धक्का दिला. तीनही गटातील दोन माजी महापौर आणि 20 नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.

एकनाथ शिंदेंनी आधी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे कट्टर समर्थन शारंगधर देशमुख यांना फोडलं. त्यानंतर आता महापालिकेच्या निवडणुकांआधी एकनाथ शिंदेंनी परत एकदा कोल्हापूरवर लक्ष केंद्रीत करत तेथील भाजप- काँग्रेस आणि ताराराणी आघाडीला धक्का दिला. येथील जवळपास २० नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. काँग्रेसचे प्रमुख मोहरे फोडल्याने हा सतेज पाटील यांना धक्का मानला जात आहे.

कोल्हापुरातील सतेज पाटील यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी एकनाथ शिंदेंनी कंबर कसलीय. शिंदेंच्या शिवसेनेची जबाबदारी आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांच्यावर आहे. सत्यजित कदम यांच्या पुढाकाराने भाजप आणि ताराराणी आघाडीतील काही नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे कोणताही प्रमुख चेहरा नाहीये, त्यामुळे नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असल्याची चर्चा आहे.

या नेत्यांनी शिवसेनेत केला प्रवेश

माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी महापौर प्रतिभा नाईकनवरे, उपमहापौर दिंगबर फराकटे, प्रकाश नाईकनवरे, अभिजित चव्हाण, रीना कांबळे, तात्या खेडकर आणि त्यांच्या पत्नी, गीता गुरव, अश्विनी बारामते, सचिन मोहिते(सुनंदा मोहिते), संभाजी जाधव, संगीता संजय सावंत, पूजा नाईकनवरे, रेखा पाटील, जहांगीर पंडत, भरत लोखंडे या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

जालन्यात ठाकरे गटाला मोठा धक्का

उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीला दिलेला शब्द पाळला नाही म्हणून जालन्यातील एका ठाकरे गटाच्या शिलेदाराने पक्षाला रामराम ठोकलाय. ठाकरे गटाचे राज्य सचिव डॉ. संजय लाखे पाटील यांनी पक्ष सदस्याचा राजीनामा दिलाय. लोकसभेचे तिकीट देतो म्हणून उद्धव ठाकरेंनी शब्द दिला होता पण तो त्यांनी पाळला नाही, असं म्हणत डॉ. संजय लाखे यांनी राजीनामा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tourist Places Nashik: खंडाळा, महाबळेश्वरही विसराल..! नाशिकजवळच्या 'या' हिल स्टेशन्सला नक्की भेट द्या

Maharashtra Live News Update : जुने नाशिक चौक भागात जुना वाडा कोसळला

Sambhaji Brigade : जन सुरक्षा विधेयकावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; कार्यकर्ते थेट मंत्रालयात घुसले, VIDEO

No-Wash Hair Tips : आता केसांचा चिकटपणा घालवण्यासाठी केस धुण्याची गरज नाही, या टिप्स फॉलो करा

तासाभरात येतो म्हणत घराबाहेर पडला, दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला; उद्योजकासोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT