Kolhapur, Muslim Childrens, Police, Bihar, Truck, Aajara saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : बिहारची 63 मुलं कोल्हापूरात, आज-याला निघालेला ट्रक फिल्मी स्टाईलने पाेलीसांनी घेतला ताब्यात (पाहा व्हिडिओ)

पाेलीसांनी या मुलांची कसून चाैकशी सुरु केली आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : बिहार राज्यातील मुस्लिम समाजातील 61 मुलांना घेऊन जाणारा ट्रक कोल्हापूर पोलिसांनी पकडला. या ट्रकमध्ये सात ते चाैदा वयोगटातील 61 मुस्लिम समाजातील लहान मुलं आहेत. बिहार येथून रेल्वेतून 63 मुलं काेल्हापूरात (kolhapur) आली. बिहार (bihar) येथून आलेल्या मुलांपैकी दाेन मुलं बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी संशय व्यक्त करुन पाेलिसांना माहिती दिली. त्यामुळे पाेलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन मुलं कशासाठी आणली गेली याची चाैकशी सुरु केली आहे. (Breaking Marathi News)

काेल्हापूर पाेलिसांनी ट्रकच्या चालकाकडे चाैकशी केली असता त्याला समर्पक उत्तरं देता आलेली नाहीत. प्राथमिक माहितीनूसार ही सर्व मुलं बिहारमधून कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा येथे सणाऱ्या एका मदरशात शिक्षणासाठी आणली गेली आहेत. पाेलिसांनी संबंधित शिक्षण संस्थेकडे याबाबत विचारणा केली असताना संस्थेतून देखील ही सर्व मुलं शिक्षणासाठी आणल्याचे सांगितले गेले आहे.

हिंदुत्ववादी संघटनेचे सदस्य विजेंद्र माने म्हणाले या ट्रक चालकाकडे चाैकशी केली असता ताे घटनास्थळावरुन पळून गेला. त्यातील अन्य एकाने ही मुलं मदरशा येथे नेण्यात येत असल्याचे सांगितले गेले. या मुलांकडे असणारी रेल्वेचे तिकीट आणि ते सांगत असलेले येण्याचे ठिकाण यामध्ये तफावत आढळली. हे सर्व विद्यार्थी आहेत असे सांगितलं गेले परंतु तसे वाटत नाही. त्यांच्याकडे याेग्य कागदपत्रं नव्हती.

पाेलिसांना आम्ही सर्व गाेष्टींची पडताळणी करावी अशी मागणी केली आहे. संबंधितांवर चाैकशीनंतर याेग्य ती कायदेशिर कारवाई करावी असे माने यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT