Kolhapur Police Arrests Five Youth saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Police News : काेल्हापूर पाेलीसांनी आंतरराज्य टोळी पकडली; 36 गुन्हे उघडकीस, 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

या टाेळीतील काही जण बनावट नाव सांगून शहरात वावरत हाेते अशी माहिती पाेलिसांनी दिली.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात विशेषत: शहरात काही दिवसांपासून चाेरी, दराेडा, साेनसाखळी चाेरी अशा प्रकारच्या घटना वाढल्या आहेत. त्यावर आळा बसावा यासाठी काेल्हापूर पाेलीस दल अटाेकाट प्रयत्न करीत आहेत. विविध उपयायाेजना राबवीत आहे. यातूनच जबरी चोरी आणि घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी काेल्हापूर पाेलीसांच्या (kolhapur police) हाती लागली आहे.  (Maharashtra News)

कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे आणि करवीर पोलीस ठाणे हद्दीतील माॅर्निंग वाॅकला गेलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या दोघा परप्रांतीय चोरट्यांना जुना राजावाडा पोलिसांनी तिरंगा चौकात सापळा लावून नुकतेच जेरबंद केले हाेते. या चाेरट्यांची अधिक चाैकशी केली असता पाेलिसांना आणखी काही गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.

पाेलिसांनी (police) आज (शुक्रवार) दिलेल्या माहितीनूसार जबरी चोरी आणि घरफोडी करणा-या आंतरराज्य टोळीकडून एकूण 36 गुन्हे उघडकीस करण्यात आले आहेत. यामध्ये पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाईल्स, गन बुलेट्स, गन मॅक्झिन जप्त करण्यात आले आहे. सुमारे 35 लाख 83 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबराेबरच एक चार चाकी, दोन दुचाकी देखील संशयितांकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT