Kolhapur Crime News  Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur: शाळेतील मुलींना दाखवायचा पॉर्न व्हिडिओ, नराधम शिक्षकाला घातल्या बेड्या

विद्यार्थिनींनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. याबाबत आता शिक्षकास पोलिसांनी अटक केलेली आहे.

Gangappa Pujari

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील एका शाळेतील धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. शाळेतील 9वी आणि 10वीच्या मुलींना शिक्षकाने पॉर्न व्हिडीओ दाखवल्याचा प्रकार घडला होता. याबद्दल विद्यार्थिनींनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. याबाबत आता शिक्षकास पोलिसांनी अटक केलेली आहे. (kolhapur News)

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित शाळेतील विद्यार्थिनींनी धाडस करून तक्रार दाखल केल्याने या नराधम शिक्षकास पोलिसांनी बेड्या घातलेल्या आहेत. हा शिक्षक गेली दोन वर्ष आठवी ते दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत लगट करण्याचा प्रयत्न करत होता. इतकच नव्हे या नराधम शिक्षकाने काही मुलींना चक्क पॉर्न व्हिडिओ दाखविले होते.

यातील काही विद्यार्थिनींनी धाडस करून शिक्षकाविरोधात तक्रारपेटीमध्ये तक्रारी नोंदवल्या. या तक्रारीची नोंद घेऊन संस्थेने ताबडतोब या शिक्षकाची साताऱ्यामध्ये बदली केली. या प्रकाराची चर्चा अख्या गावामध्ये पसरली होती.

शिक्षकाची केवळ बदली केली, मात्र त्याच्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने गावात संताप ही वाढत होता. या संदर्भात साम टीव्हीनेही बातमी प्रसारित करताच काल रात्री शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

दोन वर्षांपासून सुरू होता प्रकार...

गेली दोन वर्षे या गावातील विद्यार्थिनी या शिक्षकाच्या अश्लील कृत्यांना सहन करीत होत्या. मात्र त्यांचा बांध अखेर फुटला आणि काही मुलींनी या शिक्षकाविरोधात थेट तक्रारी दाखल केल्या. 'तक्रार माघार घ्या अन्यथा आपण आत्महत्या करू' अशा धमक्याही या विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना या शिक्षकाने दिल्याची चर्चा गावात आहे.

मात्र कोणत्याही धमक्यांना न घाबरता या विद्यार्थिनींनी आपल्या तक्रारी नोंदवल्या आणि हा शिक्षकाला अखेर बेड्या ठोकल्या गेल्या. या विद्यार्थिनींचे कौतुक गावपातळीवर सध्या होताना दिसत आहे.

दरम्यान, पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांची सुद्धा चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिलेला आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात शालेय पोषण आहार योजना घोटाळ्यावरुन कृती समिती आक्रमक

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT