Monkey Attack Saam tv
महाराष्ट्र

Monkey Attack : माकडाच्या हल्ल्यात विद्यार्थी जखमी; शाळेच्या आवारात मुले खेळत असताना घडली घटना

Kolhapur News : कोल्हापुरातील राजारामपुरी दहाव्या गल्लीत असलेल्या पाटणे हायस्कूल समोर काही मुलं शनिवारी दुपारी खेळत होते.

Rajesh Sonwane

रणजित माजगावकर

कोल्हापूर : कोल्हापुरातील तवणाप्पा पाटणे हायस्कूल समोर खेळत असणाऱ्या विद्यार्थ्यांवर माकडाच्या कळपाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे. हि घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली असून जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

कोल्हापुरातील (Kolhapur) राजारामपुरी दहाव्या गल्लीत असलेल्या पाटणे हायस्कूल समोर काही मुलं शनिवारी दुपारी खेळत होते. यावेळी खेळात असलेल्या मुलांवर शाळेच्या परिसरातील झाडावर बसलेल्या माकडांच्या कळपाने अचानकपणे धाव घेत हल्ला केला. यावेळी शौर्य भोसले हा विद्यार्थी पळून बाजूला जात असताना माकडाने पाठीमागून त्याच्या अंगावर उडी (Monkey Attack) मारली. यामुळे शौर्य जोरात रस्त्यावर आढळल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली. नागरिकांनी या माकडांना हुसकवून शौर्याची सुटका केली. 

सीसीटीव्हीत घटना कैद 

तीन- चार मुले खेळत असताना त्यांच्या मागे माकडाने पाठलाग करत एकावर हल्ला केला. माकडाच्या हल्ल्यात शौर्य जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा संपूर्ण प्रकार या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे. या परिसरात माकडाच्या कळपाची चांगलीच दहशत बसलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

काळा लसूण म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे|Black Garlic Benefits

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT