Shaktipeeth Highway Saam tv
महाराष्ट्र

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातून जात असलेल्या नागपूर- गोवा हा शक्तीपीठ महामार्ग प्रस्थापित आहे. या महामार्गामुळे कागल, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील शेकडो एकर जमिनीचे भूसंपादन सुद्धा करण्यात येणार आहे.

Rajesh Sonwane

रणजीत माजगावकर   

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या वतीने नागपूर ते गोवा हा प्रस्थापित शक्तीपीठ महामार्ग तयार करण्यात येणार आहे. या महामार्गासाठी (Kolhapur) कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो एकर सुपीक जमीन जाणार आहे. यामुळे या महामार्गाला (Farmer) शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून शेतकऱ्यांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. (Latest Marathi News)

कोल्हापूर जिल्ह्यातून जात असलेल्या (Nagpur) नागपूर- गोवा हा शक्तीपीठ महामार्ग प्रस्थापित आहे. या महामार्गामुळे कागल, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील शेकडो एकर जमिनीचे भूसंपादन सुद्धा करण्यात येणार आहे. यामुळे सुपीक जमीन यात जाणार असल्याने याला आता शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. याच विरोधात आज कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत कोणत्याही परिस्थितीत आम्ही सुपीक जमीन शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही; असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शक्तीपीठ महामार्गाला असलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधाच्या भावना कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांना कळवू. हा महामार्ग सुपीक जमिनीतून होणार नाही; यासाठी आपण प्रयत्न करू असं पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सांगितलं आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी ६० हुन अधिक गावातील शेकडो एकर सुपीक जमीन जाणार आहे. त्यामुळे या महामार्गा विरोधात आता शेतकऱ्याचा विरोध वाढत चाललेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Ponkshe : शरद पोंक्षेंच्या त्या 'सावली'ची गोष्ट, जिच्यामुळे हिमालय उभा राहिला

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळयाचे लोकार्पण सोहळा

गिरिजा ओक, गौतमी पाटील ते प्रणित मोरे; Bigg Boss Marathi 6 साठी कोणाच्या नावांची चर्चा

New Year 2026 Upay: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी करा हे उपाय, संपूर्ण वर्षाची पिडा होईल दूर

लग्नानंतर नवऱ्याचे अनैतिक संबंध, दुसऱ्या प्रेमासाठी बायकोचा खून; 'असा' झाला हत्येचा उलगडा

SCROLL FOR NEXT