Kolhapur News Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur Shocking News : माय-लेकाचा एकाच वेळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; इचलकरंजीतील मन सुन्न करणारी घटना

Kolhapur Latest News : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात मंगळवारी रात्री मुलगा प्रीतम तेरदाळे (३० वर्ष) आणि आई शोभा तेरदाळे (५४ वर्ष) यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने एकाच वेळी मृत्यू झाला.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर

Kolhapur News :

कोल्हापुरातील इचलकंरजी येथून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मुलाच्या मृत्यूनंतर आईचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

माय-लेकाच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय तर परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. (Live Marathi News)

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात मंगळवारी रात्री मुलगा प्रीतम तेरदाळे (३० वर्ष) आणि आई शोभा तेरदाळे (५४ वर्ष) यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने एकाच वेळी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुजारी मळा परिसरातील राहणारा प्रीतम तेरदाळे हे रात्री आपल्या दारात मोबाईल बघत बसला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रीतमच्या अचानक छातीत दुखू लागलं. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. हेच पाहताना प्रीतमची आई शोभा यांनाही त्याचवेळी हृदयविकाराचा झटका आला. यात दोघांचाही दुर्दैव मृत्यू झाला आहे.

एकाच वेळी मुलगा आणि आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने पुजारी मळा परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अमित शहांच्या बॅगांची तपासणी

BKC Metro Fire: बीकेसी मेट्रो स्टेशनला आग; आगीमुळे सर्व मेट्रो थांबवल्या

Breakfast Dishes : तुमच्या लहानग्यांसाठी हेल्दी अन् टेस्टी नाश्ता, मुलं बोट चाटत राहतील

Pune Crime : गार वडापाव दिल्याचा राग; स्नॅक्स सेंटर मालकाला जबर मारहाण

W,W,W,W,W,W,W,W,W,W.. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने रणजी ट्रॉफीत राडा केला! Anshulने एकाच डावात घेतल्या 10 विकेट्स

SCROLL FOR NEXT