Kolhapur News Saam Digital
महाराष्ट्र

Kolhapur News : कोल्हापुरात घडली नात्याला काळीमा फासणारी घटना; जन्मदात्या आईनेचं विकलं मुलीला

Kolhapur Crime news : पैशांच्या हव्यासापोटी मित्राच्या मदतीने आईनेच पोटच्या मुलीची विक्री केली आहे. १ लाख रुपयांच्या बदल्यात कोल्हापूर इंगळी गावातील महिलेने गोव्यातील फातिमा फर्नांडिस या महिलेलेसोबत बोलणी केली होती.

Sandeep Gawade

कोल्हापूरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आली आहे. पैशांच्या हव्यासापोटी मित्राच्या मदतीने आईनेच पोटच्या मुलीची विक्री केली आहे. १ लाख रुपयांच्या बदल्यात इंगळी गावातील महिलेने गोव्यातील फातिमा फर्नांडिस या महिलेलेसोबत बोलणी केली होती. पुनम ढेंगे असं या निर्दयी महिलेचं नाव आहे. याची माहिती मिळताच तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच संबंधित महिला तिचा मित्र सचिन कोंडेकर, स्टॅम्प करणारा किरण पाटील, मुलीला विकत घेणारी फातिमा फर्नांडिस आणि जेरी नोरोन्हा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान विक्री झालेल्या मुलीला परत आणण्यासाठी पोलीस पथक तात्काळ गोव्याला रवाना झालं आहे.

इंगळी इथं रहात असलेले दिलीप आणि पूनम पती पत्नी असून त्यांना एक वर्षाची संस्कृती नावाची मुलगी आहे. पती आणि पत्नीत गेल्या एक वर्षा पासून कौटुंबिक वाद असल्याने पूनम आपल्या लहान मुलीसह माहेरी आईकडे राहात होती. याच दरम्यान पूनमचे सचिन कोंडेकर यांच्यासोबत ओळख झाली आणि त्यांच्यात मैत्री झाली. पैशांच्या हव्यासापोटी पूनम आणि सचिन याने संस्कृती विकण्याचा घाट घातला. 27 मार्च रोजी कोल्हापूर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात गोवा इथं राहणाऱ्या फातीमा फर्नाडिस आणि जेरी नोरोन्हा यांना मुलीला १ लाख रुपयांत विकलं.

याची माहिती पूनमचा पती दिलीप ढ़ेंगे यांना समजताच त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी या सर्वावर गुन्हा दाखल करून मुलीच्या शोधासाठी गोवा इथं पोलीस पथक रवाना केली आहेत. याप्रकरणी पूनम ढेंगे, सचिन कोंडेकर, किरण पाटील, फातिमा फर्नांडिस आणि जेरी नोरोन्हा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. या गुन्हयाचा तपास लक्ष्मीपुरीचे महिला सहा.पो.नि. रुपाली पाटील करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar: गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गोंधळ, पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये कार्यकर्त्याचा मृत्यू

Maharashtra News Live Update: चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

Balumama Temple Trust : बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार, ५ जणांना अटक, नेमकं प्रकरण काय?

Weight Loss : ३० दिवसांत पोटावरची चरबी होईल कमी, चालून आल्यावर १ ग्लास प्या 'हा' हेल्दी ग्रीन ज्यूस

High cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणजे हार्ट अटॅक येणारच? हदयरोग तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT