Shreya Maskar
वजन कमी करण्यासाठी दुधी भोपळा खूपच गुणकारी आहे. रोज सकाळी चालून आल्यावर एक ग्लास दुधी भोपळ्याचा ज्यूस प्यायला तर पोटावरची अतिरिक्त चरबी झटपट कमी होते.
दुधी भोपळा वजन कमी करण्यास मदत करतो, कारण त्यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते आणि पाण्याचे प्रमाण भरपूर असते.
दुधी भोपळ्याचा ज्यूस बनवण्यासाठी दुधी भोपळा, पुदिन्याची पाने, आल्याचा तुकडा, पाणी, काळे मीठ, लिंबाचा रस आणि जिऱ्याची पूड इत्यादी साहित्य लागते.
दुधी भोपळ्याचा ज्यूस बनवण्यासाठी सर्वप्रथम दुधी भोपळ्याची साल काढून तो चिरून घ्या. दुधी भोपळ्यातील बिया काढून टाका.
कच्च्या भोपळ्याचा एक छोटा तुकडा नेहमी चाखून पाहा, जर तो कडू लागत असेल तर तो वापरू नका आणि फेकून द्या, कारण कडू दुधी भोपळ्याचा रस विषारी असू शकतो आणि त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतो.
दुधी भोपळा, पुदिना, आले, पाणी, काळे मीठ, लिंबाचा रस आणि जिरे एका मिक्सरच्या भांड्यात एकत्र करा.
तयार मिश्रण आता बारीक गाळणीने गाळून घ्या. ज्यूस एका ग्लासमध्ये ओता आणि आस्वाद घ्या. लक्षात ठेवा ज्यूस बनवल्यावर लगेच प्या.
दुधी भोपळ्यामध्ये भरपूर फायबर असते. फायबर पचनसंस्थेतून हळू प्रवास करते. यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि अयोग्य पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. यात फॅट अजिबात नसते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.