Kolhapur News Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News: बालपणाचे मित्र सकाळपासून सोबतच फिरले; दुचाकीवर गेले अन्‌ सोबतच संपविले जीवन

बालपणाचे मित्र सकाळपासून सोबतच फिरले; दुचाकीवर गेले अन्‌ सोबतच घेतला गळफास

साम टिव्ही ब्युरो

रणजित माजगांवकर

कोल्हापूर : हातकलंगले तालुक्यातील जुने पारगाव येथील दोन मित्रांनी एकाच वेळी एकाच झाडाला गळफास (Kolhapur News) लावून घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकले नसून याबाबत वडगाव पोलीस अधिक तपास करत आहेत. (Tajya Batmya)

कोल्‍हापूरमधील हातकलंगले तालुक्यातील जुने पारगाव येथील बिरदेव वसाहतीमधील दोन मित्र विनायक शिवाजी पाटील (वय ४०) व त्याचा मित्र बाबासो हिंदुराव मोरे (वय ४५) यांनी आज एकाचवेळी एकाच झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. हि घटना आज दुपारी दोन ते अडीच वाजन्या च्या सुमारास घडली. नवे पारगाव येथील तात्यासाहेब कोरे सैनिक शाळेच्या पाठीमागील झाडीमध्ये हा प्रकार घडला. विनायक पाटीलचा ट्रक व्यवसाय आहे. तर बाबासो मोरे हे शेतकरी आहेत. विनायक पाटीलच्‍या पाठीमागे आई, भाऊ, पत्नी आणि एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे., तर बाबासो मोरे याच्‍या पाठीमागे आई– वडील, पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

दुचाकीवर सोबत गेले अन्‌

दोघेही जुने पारगाव येथील बिरदेव वसाहतीमध्ये रहात होते. दोघे ही चांगले मित्र होते. आज सकाळपासून ते दोघे एकत्रच फिरत होते. दुपारच्या वेळेस या दोघांनी मोटर सायकलवरून सैनिक शाळेच्या मागील झाडीत जाऊन एकाच झाडाला दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. ही घटना गावात समजल्‍यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT