Kolhapur News Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : पाण्यासाठी नागरिकांनी अडवला रस्ता; कोल्हापूरच्या वारे वसाहत परिसरात पाण्याच्या समस्येने नागरिक हैराण

Kolhapur News : कोल्हापूरच्या वारे वस्ती परिसरात कमी दाबाने आणि अनियमित पाणी पुरवठा होत आहे. यामुळे स्थानिक महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे

Rajesh Sonwane

रणजित माजगावकर 

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील वारे वसाहत परिसरात अनेक वर्षांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. याबाबत वारंवार महापालिकेकडे निवेदन देऊन देखील महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी आज रस्त्यावर काट्या व बॅरिकेट्स लावत रस्ता अडविला आहे. 

कोल्हापूरच्या (Kolhapur) वारे वस्ती परिसरात कमी दाबाने आणि अनियमित पाणी पुरवठा होत आहे. यामुळे स्थानिक महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर महिलांनी आज पाण्यासाठी वारे वसाहत इथून जाणारा मुख्य मार्ग अडवलेला आहे. वारे वसाहतीतील नागरिकांनी या मार्गावर काट्या बांधून रस्त्यावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली होती.  

नागरिक- वाहन चालकात वाद 

नागरिकांनी रास्ता (Kolhapur Corporation) अडविल्याने दोन्ही बाजूंनी जाणाऱ्या वाहनांचा खोळंबा झाला होता. दरम्यान नागरिकांनी अशा प्रकारे रस्ता अडविल्याने येथील स्थानिक नागरिक व वाहन चालकांमध्ये वादावादीचे प्रसंग सुद्धा घडले आहेत. परंतु पुरेसे पाणी मिळत नसल्याने महापालिका प्रशासनावर आमचा रोष असल्याने नागरिकांनी यावेळी सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT