mns raju dindorle and prasad patil Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur Breaking News : मनसेच्या जिल्हाध्यक्षासह शहराध्यक्षावर खंडणीचा गुन्हा; दोघांनाही अटक

Kolhapur MNS News : खाजगी पतसंस्थेत जबरदस्ती घुसून बँक अध्यक्षांसह उपाध्यक्षाला पट्ट्याने बेदम मारहाण केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यावर खंडणी तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय.

Satish Daud

खाजगी पतसंस्थेत जबरदस्ती घुसून बँक अध्यक्षांसह उपाध्यक्षाला पट्ट्याने बेदम मारहाण केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यावर खंडणी तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय. जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले आणि शहराध्यक्ष प्रसाद पाटील, अशी गुन्हा दाखल झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

या दोन्ही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी (Police) अटक केली आहे. याप्रकरणी खासगी पतसंस्थेच्या मालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील रंकाळा परिसरात श्री साईदर्शन जनता अर्बन को. ऑप क्रेडिट सोसायटी बँकेची मुख्य शाखा आहे.

सोमवारी 5 ऑगष्ट रोजी या शाखेत मनसेचे (MNS News) जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले आणि शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी कार्यकर्त्यांना घेऊन जबरदस्तीने प्रवेश केला. यावेळी बँकेच्या केबिनमध्ये जाऊन त्यांनी बँकेचे अध्यक्ष सचिन साबळे आणि उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण केली.

इतकंच नाही तर आरोपींनी फिर्यादींकडून खंडणी देखील मागितल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. याशिवाय जातीवाचक शिवीगाळ केल्याचा उल्लेखही तक्रारीत आहे. मारहाणीनंतर आरोपींनी संस्थेमधील 'सीसीटीव्ही'चा डीव्हीआर घेऊन पळ काढला. असंही तक्रारीत मांडण्यात आलंय.

दरम्यान या तक्रारीनुसार कोल्हापूर लक्ष्मीपुरी पोलिसांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्यासह अन्य आरोपींवर खंडणी, मारहाण करणे, तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दगडूशेठ गणपती मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट

टेस्ट, वनडे आणि टी-२० नंतर क्रिकेटमध्ये नव्या फॉरमॅटची एन्ट्री! कुठे आणि कधी होणार सुरूवात? नियम कोणते?

Horoscope Sunday: कामाच्या ठिकाणी होतील वाद, वाचा तुमच्या राशीत काय?

Bacchu Kadu :...तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू; बच्चू कडू असे का म्हणाले?

Manoj Jarange: डोळ्यावर गॉगल आणि घोड्यावर स्वारी; मनोज जरांगेंचा हटके लूक व्हायरल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT