Kolhapur News Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : दगडी मूर्तींची अघोरी पूजा; कोल्हापूर जिल्ह्यातील अंधश्रद्धेचा प्रकार

Kolhapur News : बाहेरून कोणीतरी आणून मध्यरात्री या मुर्त्या लावून त्या ठिकाणी त्यांची पूजा केल्याचं पाहायला मिळत आहे

Rajesh Sonwane

रणजीत माजगावकर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील बोरवडे गावच्या हद्दीत असणाऱ्या पठारावरील शिवारात दगडी मुर्त्यांची अघोरी पूजा (Kolhapur) केल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञातांनी ढोल वाजून ही पूजा केल्याची माहिती ग्रामस्थांची दिली. (Tajya Batmya)

कोल्हापूर जिल्ह्यातील बोरवडे गावाच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे काही अज्ञातांनी आठ दगडी मुर्त्या रंगवून उभ्या केल्याचे निदर्शनास आले आहे. यातील काही मुर्त्यांना भगवे फेटे व काहीना साड्या नेसून त्यांना हार घालून त्यांची पूजा केल्याचे उघड झालेला आहे. हा संपूर्ण प्रकार अंधश्रद्धेतून (Superstition) झाल्याची गावात सध्या चर्चा रंगलेली आहे. मध्यरात्री गावकऱ्यांना ढोल वाजल्याचे आवाज सुद्धा आले होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बाहेरून आणल्या मुर्त्या 

मध्यरात्री ढोल वाजून या पठारावर या मुर्त्या ठेवण्यात आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. यापूर्वी या पठारावर अशा दगडी स्वरूपाच्या मुर्त्या नव्हत्या. बाहेरून कोणीतरी आणून मध्यरात्री या मुर्त्या लावून त्या ठिकाणी त्यांची पूजा केल्याचं पाहायला मिळत आहे. मुर्त्यांच्या समोर कुंकू, हळद, हार, फुले आणि मूर्तींच्या पाठीमागे एक भगवा झेंडा लावल्याचेही निदर्शनास आलेला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे शेतकरी वर्गांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालेलं आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : मुलीजवळ आला पॅन्टची चैन उघडली अन्...; बसमध्ये तरुणाचं किळसवाणं कृत्य

Maharashtra News Live Update: माणगावच्या देवकुंड धबधब्यात दोन पर्यटक बुडाले

Crime News: जबरदस्ती रुममध्ये शिरला, नंतर प्रायव्हेट पार्ट दाखवून...; बेंगळुरूमध्ये डिलिव्हरी एजंटकडून तरुणीशी अश्लील वर्तन

देशात आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार, मोदींच्या हस्ते उद्घाटन; कुठून-कुठे असणार प्रवास

Palghar Fort : शौर्य अन् इतिहासाचा अनमोल वारसा, पालघरमध्ये वसलाय 'हा' भव्य किल्ला

SCROLL FOR NEXT