Kolhapur News land Sliding Saam tv
महाराष्ट्र

land Sliding : कोल्हापूर जिल्ह्यातील ८८ गावांना भुस्खलनाचा धोका; गावांची होणार दिवसातून दोनदा पाहणी

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील ८८ गावांना लँड स्लाइडिंगचा धोका; गावांची होणार दिवसातून दोनदा पाहणी

साम टिव्ही ब्युरो

कोल्हापूर : रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी इथं झालेल्या लँड स्लाइडिंग दुर्घटनेनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. (Kolhapur) कोल्हापूर जिल्ह्यात ८८ गावांना लँड स्लाइडिंगचा धोका असल्याच्या नोटिसा जिल्हा प्रशासनाच्यावतीने संबंधित गावांना बजावल्या आहेत. (Tajya Batmya)

कोल्हापूरची पंचगंगा नदीही इशारा पातळीकडे संथगतीने वाटचाल करत असून आजही कोल्हापूरच्या पश्चिम घाट माथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. या पार्श्वभूमीवर या ८८ गावांना अलर्ट जारी करण्यात आला असून संबंधितांना प्रशासनाने नोटीसाही बजावल्या आहेत. तसेच सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचनाही केलेल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचे जवान आणि एनडीआरएफची एक तुकडी आपत्ती निवारणासाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे.

दोन दिवस ऑरेंज अलर्ट 

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि शाहूवाडी तालुक्यातील गावांची संख्या अधिक आहे. दरम्यान, उद्या आणि परवा कोल्हापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट (Rain Alert) असल्याने जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता, या ८८ गावांना दिवसातून दोनदा तलाठी, ग्रामसेवक किंवा सर्कल ऑफिसर यांनी भेटी देण्याचे आदेश दिले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price : अचानक किंमती घसरल्या! चांदी ₹१७०००, सोनं ₹३००० ने स्वस्त; वाचा 24K, 22K, 18K गोल्डचे ताजे दर

Nashik : नाशिक हादरलं! पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

पुण्यातील रुग्णालयात बॉम्ब ठेवणारा आरोपी कोण? नागपूर कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

SCROLL FOR NEXT