Kolhapur Cyber Chowk Accident 
महाराष्ट्र

Kolhapur News: कोल्हापूरात अपघाताचा थरार, कारच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू तर ६ गंभीर जखमी; अपघात CCTV मध्ये कैद

Kolhapur Cyber Chowk Accident: कोल्हापूरमध्ये भरधाव कारने तीन वाहनांना धडक देत चौघांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. या अपघाताचा तपास कोल्हापूर पोलिस करत आहेत.

Priya More

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये भीषण अपघाताची (Kolhapur Accident) घटना समोर आली आहे. भरधाव कारने चार वाहनांना जोरदार धडक दिली. त्यानंतर या कारने चौघांना चिरडले. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूरच्या सायबर चौक परिसरामध्ये ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरातील सायबर चौक परिसरात ही अपघाताची घटना घडली. चौकामधून रस्त्या ओलांडत असताना भरधाव कारने चार दुचाकींना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील काही जण चेंडूसारखे दूरवर फेकले गेले. हा थरकाप उडवणारा अपघात चौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये चारही दुचाकींसह कारचे मोठे नुकसान झाले आहे. कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या अपघातामध्ये जखमी झालेल्या ६ ही जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT