Villagers in Nandani take out a silent march holding placards to stop the transfer of temple elephant Mahadevi, worshipped for over 30 years. Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

Supreme Court Challenge On Elephant Rights: कोल्हापूरात एका हत्तीणीसाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेत. ग्रामस्थ एव्हढे आक्रमक का झालेत? नेमकं प्रकरण काय?

Suprim Maskar

ही आहे...कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळमधल्या जैन मठाकडे गेल्या 34 वर्षांपासून असणारी माधुरी उर्फ महादेवी हत्तीण.. याचं महादेवी हत्तीणीसाठी नांदणीतील ग्रामस्थ आता रस्त्यावर उतरलेत...लढायचं भिडायचं ते आपल्या माधुरीसाठीच.. अशा आशयाचे फलक घेऊन नांदणी पंचक्रोशीतील हत्तीण बचाव कृती समितीनं गावात मोर्चा काढलाय. आतापर्यंत वेगवेगळ्या मागण्यांसाठी मोर्चात सहभागी होणारे लोक पाहिले असतील... मात्र एका हत्तीणीसाठी निघालेला हा महाराष्ट्रातील पहिलाच मूक मोर्चा असावा..

'महादेवी'चा संघर्ष कधी थांबणार

'पेटा' संस्थेकडून हत्तीणीची नीट काळजी घेत नसल्याचं सांगत तक्रार दाखल

तक्रारीची शहानिशा करण्यासाठी उच्चाधिकार समितीची स्थापना

समितीकडून 2023 मध्ये हत्तीणीला गुजरातला पाठवण्याची शिफारस

निर्णयाविरोधात मठानं 2024 मध्ये हायकोर्टात याचिका दाखल

डिसेंबर 2024 - समिती हत्तीणीला गुजरात 'वनतारा'मध्ये पाठवण्यावर ठाम

2025 - मठानं पुन्हा याचिका दाखल करून उच्च न्यायालयात आव्हान

मुंबई हायकोर्टाचे महादेवीला वनतारामध्ये सोडण्याचे आदेश

मठाकडून हत्तीच्या ताब्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

दरम्यान महादेवी हत्तीणीला नेण्यासाठी वनताराचे पथक येणार असल्याचा समज झाल्यानंतर मध्यरात्री हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आणि या निर्णयाला विरोध केला. मुळात नांदणी येथील मठाला 1300 वर्षांचा वारसा आहे. गेल्या अनेक वर्षापासून मठात येणाऱ्या भाविकांसाठी 'महादेवी' पूजनीय आहे. 33 वर्षांपासून नांदणी ग्रामस्थ हत्तीणीचा सांभाळ करत असतील तर इतक्या वर्षांपासून प्राणी हक्काचा मुद्दा का उपस्थित करण्यात आला नाही ? महादेवी वनतारा सारख्या खाजगी प्राणीसंग्रहालयात नेण्यामागे कारण काय? असा सवाल उपस्थित केला जातोय.

प्राणी हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराचा हा संघर्ष असल्याचं सांगून मुंबई हायकोर्टानं हा निर्णय दिलाय. मात्र पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा रोष पाहता सर्वोच्च न्यायालय हायकोर्टाचा निर्णयावर काय भूमिका घेणार? हत्तीणीसाठीचा संघर्ष कधी थांबणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT