kolhapur, internet service resume saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : काेल्हापूर पूर्वपदावर; इंटरनेट सेवा सुरळीत, १९ जूनपर्यंत जमावबंदी

Kolhapur Clash News : शहरात 19 जूनपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

Siddharth Latkar

Kolhapur News : काेल्हापुरातील हिंसाचारप्रकरणी पाेलिसांनी 36 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी पाच जण अल्पवयीन असल्याचे समजते. याबाबत काेल्हापुरचे एसपी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती देतील अशी शक्यता आहे. दरम्यान आज (गुरुवार) काेल्हापुर शहर पुर्वपदावर येताना दिसत आहे. (Maharashtra News)

समाज माध्यमात (social media) वादग्रस्त स्टेटस ठेवलेल्यांवर कारवाई करावी या मागणी बुधवारी काेल्हापूरात (Kolhapur Morcha update) हिंदुत्ववादी संघटना बंदचे आवाहन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चाैकात जमा झाले. यानंतर आंदाेलन छेडण्यात आले. या आंदाेलन काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काहींवर पाेलिसांनी लाठीचार्ज (kolhapur lathi charge) केला. त्यामुळे आंदाेलक आक्रमक झाले. त्यातून दगडफेकीच्या घटना घडल्या. परिणामी शहरात तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले.

पालकमंत्री दिपक केसरकर यांनी विविध संघटना आणि प्रशासनासमवेत बैठक घेतली. या बैठकीत सर्वांनी संयम ठेवावा असे आवाहन करीत पालकमंत्र्यांनी शहर आणि शहरातील नागरिकांचे काेणत्याही प्रकारचे नुकासन हाेऊ नये याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.

आज सकाळपासून शहरातील विविध भागातील दुकानं उघडण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चाैक येथे पाेलिसांचा बंदाेबस्त आहे. शहरातील बस थांबे येथे नागरिकांची वर्दळ आहे. आज सकाळी शहरातील काही भागातील इंटरनेट सेवा सुरळीत झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratalyachi Kheer Recipe: सुट्टीच्या दिवशी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी रताळ्याची खीर

Mumbai Crime : धक्कादायक! मुंबई लोकलमध्ये ट्रान्सजेंडरने नको ते केले, तरुणीच्या अंगाला स्पर्श केला अन्....

Benefits of Good Sleep: कोणत्या वयोगटातील व्यक्तींना किती तासांच्या झोपेची गरज असते? न्यूरोलॉजिस्टने सांगितली परफेक्ट स्लीप गाईड

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Matoshree : मातोश्रीवर नजर ठेवली जातेय, ठाकरेंच्या नेत्यांचा गंभीर आरोप, तो व्हिडिओ केला पोस्ट

SCROLL FOR NEXT