महाराष्ट्र

Ambabai Temple: कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात गळती; पुरातत्वच्या काराभारामुळे मंदिर धोक्यात?

Ambabai Temple : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेलं कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिराला पावसात गळती लागलीय. पुरातत्व विभागाकडून जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे. त्यामुळे हे कामच आता वादात सापडलंय. मंदिरात गळती नेमकी कशामुळे होतेय? मूळ शिल्पांचं नुकसान होतेय का? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • अंबाबाई मंदिरात पावसाळ्यात गळती होत असल्याची बाब समोर आली आहे.

  • पुरातत्व विभागाकडून सुरू असलेले जतन आणि संवर्धनाचे काम वादाच्या भोवऱ्यात

  • मंदिराच्या मूळ शिल्पकलेचे आणि ऐतिहासिक वास्तूचे नुकसान

रोहित कदम, साम प्रतिनिधी

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी पुरातत्व विभागाकडून जोरदार काम सुरू आहे. मात्र, आता अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या संवर्धन कामादरम्यान छतातून गळती झाल्याचे समोर आलंय. याचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. अशातच आता छताचं सिमेंट काढताना ग्राईंडर वापरल्यानं मंदिरातील मूळ शिल्पांचं नुकसान झाल्याचा आरोप भाविकांनी केलाय. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

इतकंच नव्हे तर, पुरातत्व विभागाच्या कारभारामुळे अंबाबाई मंदिरासह इतरही मंदिरं धोक्यात असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. तर दुसरीकडे, मंदिर शिखरावर पावसाचे पाणी झिरपत असल्याने दगडी भागावर झुडपे आणि गवत उगवू लागले होते. याबाबतही मंदिर अभ्यासकांनी चिंता व्यक्त केलीये.

अंबाबाई मंदिर संवर्धनाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर सर्व तांत्रिक निकषांचे पालन करूनच काम करत असल्याचा दावा पुरातत्त्व विभागाने केलाय. मात्र, यासंदर्भात निर्माण झालेल्या संभ्रमावर अद्याप पुरातत्त्व विभाग किंवा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये. मात्र या गळतीची गंभीर दखल घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT