Gadhinglaj Police Station Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur News: सुट्टीवर घरी आला होता 'जवान', पत्नीने हात-पाय आणि डोळे बांधून विष पाजलं; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

Gadhinglaj News: सुट्टीवर घरी आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानाचे हात-पाय आणि डोळे बांधून विष पाजण्याची घटना कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यात घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे सुट्टीवर घरी आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानाचे हात-पाय आणि डोळे बांधून विष पाजण्याची घटना घडली आहे. या जवानाला ठार मारण्याच्या प्रयत्नाबद्दल पत्नीसह अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अमर भिमगोंडा देसाई, असे या ३९ वर्षीय जवानाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे नूल (ता. गडहिंग्लज) गावचे असलेले अमर हे पत्नीसह गडहिंग्लजला संकेश्वर रोडवरील पाटणे पाईप कारखान्याजवळ भाडोत्री घरात राहतात. अमर ड्युटीवर गेल्यानंतर पत्नी एकटीच घरी असते. दरम्यान, काही दिवसापूर्वीच अमर सुट्टीवर आले आहेत. गुरूवारी (ता. 18) रात्री साडेनऊच्या सुमारास राहत्या घरातच पत्नी व तिच्या अज्ञात साथीदाराने अमरचे हात-पाय, डोळे बांधून त्याला नाकावाटे व तोंडावाटे कोणते तरी विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करीत होते.

त्यावेळी अमर याने जोरात ओरडल्याने शेजारचे नागरिक त्यांच्या घरी आले. दरवाजा तोडून नागरिकांनी आत प्रवेश केला. त्यावेळी अज्ञात साथीदाराने खाडे नावच्या नागरिकाच्या डोक्यात कशाने तरी मारून तेथून पळून गेला. त्यानंतर नागरिकांनी जखमी खाडे व अमर यांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले.

येथे प्राथमिक उपचारानंतर अमर यांना कोल्हापुरच्या सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. अमर याच्या फिर्यादीवरून पोलिसात पत्नी व अज्ञात साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maternal Sepsis: गर्भधारणेनंतरचा संसर्ग ठरू शकतो जीवघेणा, मॅटर्नल सेप्सिसबाबत महिलांनी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Maharashtra News Live Update: कल्पना खरात अटकपूर्व जामीन प्रकरण तहकूब

Makeup Side Effects : मेकअप करायला खूप आवडतो? मग शरीरावर होणारे 'हे' गंभीर दुष्परिणाम वाचून बसेल धक्का

आसाममध्ये पुन्हा NDA सरकार; हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली दुसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ,VIDEO

Mango : आंबा खाल्ल्यानंतर पाणी कधी प्यावे? आताच जाणून घ्या वेळ, अन्यथा होतील गंभीर आजार

SCROLL FOR NEXT