Kolhapur DCC Bank, Swabhimani Shetkari Sanghatana , Raju Shetti saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : मध्यरात्री 'स्वाभिमानी' च्या उपाेषणकर्त्यांना उचललं, काेल्हापूर जिल्हा बॅंकेस पाेलिसांचे संरक्षण; राजू शेट्टी पाेहचताच...

जिल्हा प्रशासनाने घेतली आंदाेलकांसमवेत बैठक.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर गेल्या तीन दिवसांपासून बसलेल्या उपोषणकर्तांना कोल्हापूर पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतले. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Swabhimani Shetkari Sanghatana Leader Raju Shetti) यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यात झालेल्या बैठकीनंतर आंदाेलकांना पाेलिसांनी साेडले. त्यानंतर आंदाेलकांनी उपाेषण मागे घेतले. (Maharashtra News)

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या काही संचालक राजकीय सूडबुद्धेने करत असलेल्या मनमानी कारभाराच्या विरोधात साेमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेमुदत उपोषणास प्रारंभ केला. या आंदाेलनात युवा शेतकरी माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.

दरम्यान मध्यरात्री के.डी.सी. सी. बॅंक येथे बसलेल्या उपोषणकर्त्यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना मार्केट यार्ड याठिकाणी ठेवले. रात्री २ वाजता जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांनी दुरध्वनीवरून संपर्क साधून आज (गुुरुवार) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बॅंकेचे पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक बाेलावली.

सकारात्मक चर्चा

या बैठकीस राजू शेट्टी यांचेसह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याने स्वाभिमानीच्या आंदोलनाच्या धसक्याने केडीसीसी बॅंकेस पोलिस छावणीचे स्वरूप आले हाेते. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार (rahul rekhawar) आणि कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित (sp mahendra pandit) यांच्यामध्ये कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सविस्तर चर्चा झाली.

उपाेषण घेतलं मागे

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून योग्य तो प्रतिसाद दिला जाईल असे आश्वासन मिळताच जिल्हाधिकाऱ्यांसमोरच आंदोलकांना नारळ पाणी देण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी त्यांचे उपाेषण मागे घेतले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरिक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

SCROLL FOR NEXT