Kolhapur Crime News Woman killed for refusing physical abuse incident in Ajara taluka Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur News: संतापजनक! शरीरसंबंधास नकार दिल्याने महिलेची हत्या; मृतदेह ऊसाच्या फडात फेकला, नराधमास अटक

Kolhapur Crime News: शरीर संबंधास नकार देणाऱ्या महिलेची एका नराधमाने हत्या केली. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून आरोपीने मृतदेह ऊसाच्या फडात फेकून पेटवून दिला.

Satish Daud

Kolhapur Latest Crime News

शरीर संबंधास नकार देणाऱ्या महिलेची एका नराधमाने हत्या केली. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून आरोपीने मृतदेह ऊसाच्या फडात फेकून पेटवून दिला. मात्र, हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने आरोपीचे बिंग फुटले. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात हा संतापजनक प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

योगेश पांडुरंग पाटील (वय ४६, रा. भादवन) असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या पतीचे निधन झाल्याने ती आईसोबत भादवन येथे राहत होती.

पीडिता विधवा असल्याने आरोपीचा तिच्यावर डोळा होता. शुक्रवारी मृत महिला भादवन ते भादवनवाडी रस्त्यावरून जात असताना आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग (Crime News) करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलने जोरदार विरोध केला.

त्यामुळे चिडलेल्या आरोपीने तिचा गळा आवळून खून केला. हा प्रकार झाकला जावा म्हणून त्याने मृतदेह ऊसाच्या फडात फेकून पेटवून दिला. दरम्यान, ऊसाच्या फडाला आग लागल्याचं कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

धक्कादायक बाब म्हणजे घडलेला गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून आग विझवण्यासाठी आरोपी योगेशने पुढाकार घेतला होता. त्यामुळे हा प्रकार इतरांच्या लक्षात आला नाही. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा गुन्हा उघडकीस आणला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat Loss Drink: पोटाची वाढलेली चरबी कमी करायची आहे? मग रोज सकाळी प्या 'हे' खास ड्रिंक

Post Office RD: दररोज ३०० वाचवा अन् पोस्टात गुंतवा, फक्त व्याजातून मिळतील साडेचार लाख, वाचा सविस्तर

IPL मध्ये मोठा ट्विस्ट! प्लेईंग ११ आणि इम्पॅक्ट प्लेअरमध्ये नाव नसतानाही MI कडून फलंदाजीसाठी उतरला हा खेळाडू

Shocking : काकीसोबत पुतण्याचं सिक्रेट अफेअर! काकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् भयंकर घडलं

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या राठी जीन परिसरात भीषण आग

SCROLL FOR NEXT