Bribe, Kolhapur Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur News : आरोग्य अधिकार्‍यासह लाच घेताना वडिलांसह मुलाला अटक

वारणा कोडोली येथे ही कारवाई करण्यात आली.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : काेल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य उपसंचालक कार्यालयातील सहायक अभियंता 25 हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडला आहे. मारुती परशुराम वरुटे असे या लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. त्याच्यासोबत चालक विलास जिवनराव शिंदे आणि शिवम विलास शिंदे यांनाही रंगेहात पकडले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी सकाळी ही कारवाई केली. तक्रारदार यांचे सेवानिवृत्त नंतर रजा रोखीकरण प्रस्ताव विना त्रुटी मंजूर करतो म्हणून तक्रारदार यांचेकडे 30 हजार रुपये मागणी करून तडजोडी अंती 25 हजारांची लाच रक्कम स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली आहे. (Maharashtra News)

तक्रारदार यांनी निवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभातील रजा रोखीकरण प्रस्ताव आरोग्य उपसंचालक या कोल्हापुरातील कार्यालयात सादर केला होता. तेथे कार्यालयातील सहायक अधीक्षक वरुटे याने रजा रोखीकरणाच्या प्रस्तावात त्रुटी काढत नाही, प्रस्ताव अतिरिक्त रजेसह मंजूर करतो. पण, त्यासाठी तुम्हाला ३० हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे वरुटेविरोधात तक्रार दिली. वरुटे याने रजा रोखीकरणाचा प्रस्ताव विनात्रुटी मंजूर करण्याकरिता, प्रस्ताव अतिरिक्त रजेसह मंजूर करतो म्हणून ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २५ हजार रुपये ठरले. तसेच, लाच कोणाकडे द्यायची, याबाबत (मंगळवार, ता.30) कळवत असल्याचे सांगितले होते.

त्यानुसार सापळा रचला गेला. वरुटे याने लाचेची रक्कम संशयित आरोपी विलास शिंदे याच्याकडे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे विलास शिंदे आणि त्याचा मुलगा शिवम हे तक्रारदाराकडे लाच स्वीकारण्यासाठी आले. त्या वेळी विलास शिंदे याने तक्रारदाराकडे वरुटे याच्या सूचनेनुसार २५ हजार रुपयांची मागणी केली व हे पैसे शिवमकडे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे पंच साक्षीदारांच्या समक्ष तक्रारदाराकडून शिवम शिंदे याला २५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे म्हणाले या प्रकरणी सहायक अधीक्षक मारुती परशुराम वरुटे (वय ५०, रा. प्लॉट नं. ४, सुनंदा पार्क, पोद्दार हायस्कूलजवळ, कोल्हापूर. मूळ रा. कासारपुतळे, ता. राधानगरी), चालक विलास जीवनराव शिंदे (५७) आणि त्याचा मुलगा शिवम विलास शिंदे (२२, दोघे. रा. सरकारी हॉस्पिटलजवळ, पारगाव, ता. हातकणंगले, मूळ रा. किणी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांना अटक केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : महिलांनी पपई कधी खाऊ नये, नेमकं कारण काय? काय होतील परिणाम?

Kolhapur : शिवजयंतीला तरूणांची हुल्लडबाजी, पन्हाळा गडावर नको ते केले अन् लाज काढली, पाहा व्हिडिओ

Black Elbow Tips: हातांच्या कोपरांचा काळेपणा कसा घालवायचा?

Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन; दिर्घकालीन आजाराशी झुंज अपयशी, मनोरंजन विश्वावर शोककळा

Maharashtra Live News Update: अमरावती विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ सुविधा एप्रिलपासून होणार सुरू

SCROLL FOR NEXT