Kolhapur Crime news Saam Tv
महाराष्ट्र

गणेश मिरवणुकीत भयंकर घडलं! नाचण्यावरून वाद, भररस्त्यात चाकूनं तरूणावर सपासप वार, कोल्हापूर हादरलं

Kolhapur Crime news: कोल्हापुरातील गणेश आगमन मिरवणुकीत नाचण्याच्या वादातून चाकूहल्ला. वाजीद जमादार गंभीर जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, फुटेज पोलिसांच्या हाती.

Bhagyashree Kamble

  • कोल्हापुरातील गणेश आगमन मिरवणुकीत नाचण्याच्या वादातून चाकूहल्ला.

  • वाजीद जमादार गंभीर जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू.

  • संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, फुटेज पोलिसांच्या हाती.

  • घटनेनंतर परिसरात खळबळ, पोलिसांचा तपास सुरू.

कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गणेश आगमन मिरवणूकीत भयंकर प्रकार घडला. नाचण्याच्या वादातून मित्रांमध्ये वाद झाला. वाद टोकाला गेला. यात एका मित्राने दुसऱ्या मित्रावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात तरूण जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.

काल राज्यात धुमधडाक्यात गणरायाचं आगमन झालं. सार्वजनिक मंडळांपासून ते घरगुती गणपतीपर्यंत घरोघरी गणरायाचं आनंदाच्या वातावरणात आगमन झालं. मात्र, कोल्हापुरात एक धक्कादायक प्रकार घडला. गणेश आगमन मिरवणुकीत एकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आलं आहे.

राजारामपुरीतल्या गणेश आगमन मिरवणुकीत हा धक्कादायक प्रकार घडला. या भीषण हल्ल्यात वाजीद जमादार जखमी झाले आहेत. वाजीद आपल्याला मित्रांना मिरवणूकीत बोलावत होता. त्यानं मित्रांना नाचण्याचा आग्रह केला. यानंतर जमादाराचे मित्र संतप्त झाले. शाब्दिक बाचाबाचीनंतर हाणामारी झाली.

संतप्त मित्रांनी जमादारावर धारदार चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यात जमादार गंभीर जखमी झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज सापडला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या घटनेनंतर जमादारला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. सध्या त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी; पगार १ लाख २० हजार रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Airtel Recharge Offer: एअरटेलचा स्वस्तात मस्त प्लॅन, एका रिचार्जमध्ये कॉलिंग, डेटा, एसएमएस अन् अनेक फायदे

Heart Attack Signs: हार्ट अटॅकची 'ही' लक्षणे झोपेतच जाणवतात, वेळीच व्हा सावध, तज्ज्ञांनी दिल्ला सल्ला

Maharashtra Live News Update: शरद पवार भाकरी फिरवणार? आबांच्या मुलाला मिळणार मोठी जबाबदारी

डोंबिवलीत रेल्वे रूळावर भयंकर घडलं, भरधाव एक्सप्रेससमोर उडी मारून तरूणानं आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT