Kolhapur Chandgad MLA Shivaji Patil Honey Trap Case Saam
महाराष्ट्र

अश्लील फोटो अन् मेसेज; पश्चिम महाराष्ट्राच्या आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न, तरूणाला अटक

Kolhapur Chandgad MLA Shivaji Patil Honey Trap Case: आमदार शिवाजी पाटील यांना अश्लील मेसेज अन् व्हिडिओ पाठवल्याप्रकरणी चंदगडहून आरोपी ताब्यात. पोलीस तपास सुरू.

Bhagyashree Kamble

  • हनी ट्रॅपप्रकरणी शिवाजी पाटील यांच्याकडून तक्रार दाखल.

  • पोलिसांनी आरोपीला शोधलं.

  • चंदगडहून आरोपी ताब्यात.

आमदार शिवाजी पाटील यांना अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवल्याप्रकरणी चंदगड पोलिसांनी एका २५ वर्षीय तरूणाला ताब्यात घेतलं आहे. आरोपी चंदगड येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना मोबाईद्वारे अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवण्यात आला होता. त्यांना अश्लील मेसेज पाठवून हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न झाला होता. शिवाजी पाटील यांच्याकडे आरोपीनं दहा लाखांची मागणी केली. यानंतर पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी तक्रार दाखल केली. माहितीच्या आधारे पोलिसांनी तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी चंदगड पोलिसांनी कारवाई करत पवन पवार या तरूणाला ताब्यात घेतलंय. आरोपी चंदगड येथील रहिवासी आहे. आरोपी तरूणाला ताब्यात घेण्यासाठी ठाणे पोलीस चंदगडमध्ये जाण्याची शक्यता आहे. शिवाजी पाटील हे चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडुनी आले. पाटील यांना भाजप पक्षाचा पाठिंबा असल्याची माहिती आहे.

या प्रकरणाबाबत शिवाजी पाटील म्हणाले, 'ती व्यक्ती व्हॉट्सअॅपवर मेसेज आणि व्हिडिओ कॉल करीत होती. मी नंबर ब्लॉक केला होता. मेसेजवर अश्लील फोटो पाठवत होती. असं दोनवेळा घडलं. नंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी पकडला गेलाय. हे कृत्य राजकीय हेतू किंवा पैशांच्या मागणीतून केलं? यामागे नक्की कुणाचा हात होता? हे लवकरच स्पष्ट होईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, १० तोळे सोनं ७१०० रुपयांनी वाढले, २२ -२४ कॅरेटचा आजचा भाव किती?

Leopard Attack : आई- बाबांसोबत शेकोटी घेत होता; दबा धरून बसलेल्या बिबट्याने अलगद उचलून नेला; ४ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर

Bigg Boss Marathi Reunion Party : 'बिग बॉस मराठी'ची रंगली रियुनियन पार्टी; भन्नाट गाण्यावर थिरकले कलाकार, पाहा VIDEO

Blood Pressure कमी करण्यासाठी कोणता आहार घ्यावा? अनुभवी डॉक्टरांनी दिल्या ४ महत्वाच्या टिप्स, लगेचच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT