Kolhapur Keshavrao Bhosale Natyagruha fire:  Saamtv
महाराष्ट्र

Keshavrao Bhosale Natyagruha Fire: कोल्हापूर नगरी हळहळली! ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक; कलाकारांना अश्रू अनावर

Kolhapur Keshavrao Bhosale Natyagruha fire: या नाट्यगृहाला शंभर वर्षांपूर्वीची परंपरा आहे. राजाराम महाराज यांनी करवीर संस्थांमधील कलाकारांसाठी एक व्यासपीठ म्हणून पॅलेस थेटरची निर्मिती केली होती.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, कोल्हापूर|ता. ९ ऑगस्ट २०२४

कोल्हापूर शहरामध्ये काल भीषण अग्नितांडव पाहायला मिळाले. या आगीत ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक झाले. या नाट्यगृहाला शंभर वर्षांपूर्वीची परंपरा आहे. राजाराम महाराज यांनी करवीर संस्थांमधील कलाकारांसाठी एक व्यासपीठ म्हणून पॅलेस थेटरची निर्मिती केली होती. नंतर त्याचे रूपांतर संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झाले होते. अनेक अजरामर नाटके झालेले हे नाटयगृह आगीत जळून खाक झाल्याने सिनेसृष्टीतील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली.

आज म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती होती. जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचा आयोजन देखील नाट्यगृह परिसरात करण्यात आलं होतं. मात्र रात्री या नाट्यगृहाला आग लागल्याने हे नाट्यगृह जळून खाक झालेले आहे.

संगीतसूर्य नटसम्राट केशवराव भोसले यांच्या 134 व्या जयंतीदिनाच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडली आहे. अग्नीशमन दलाच्या 15 ते 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीने एवढे रुद्ररुप धारण केले होते, त्यामुळे सभागृहाचा फक्त सांगडाच राहिला आहे. या सभागृहासोबत जिल्ह्यातील तसेच राज्यातील अनेक कलाकारांचे जवळचे नाते आहे.

तब्बल तीन तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. आगीच्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही भेट दिली. दरम्यान, या नाटयगृहात अनेक अजरामर नाटके झाली, अनेक दिग्गज कलाकार घडले. राजश्री शाहू महाराजांनी बांधून दिलेला हा राजाश्रय ढासळल्याचे पाहताना अनेक कलाकारांना अश्रु अनावर झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT