Kolhapur Ambabai Mandir Saam Digital
महाराष्ट्र

Kolhapur Ambabai Mandir : अंबाबाईच्या चरणी सोन्याचा सिंह अर्पण, किंमत माहिती आहे का? एकदा वाचाच

Kolhapur Mahalaxmi Mandir : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी लाखो भाविक इच्छेनुसार देणगी देत असतात. त्यातच आता एका भाविकाने अंबाबाईच्या चरणी सोन्याचा सिंह अर्पण केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी लाखो भाविक इच्छेनुसार देणगी देत असतात. त्यातच आता एका भाविकाने अंबाबाईच्या चरणी सोन्याचा सिंह अर्पण केलाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट....

महाराष्ट्रातील शक्तीपीठ असलेल्या करवीरनगरी कोल्हापूरात दरवर्षी लाखो भाविक येत असतात. अनेक भाविक आपल्या या सिंहाची किंमत तब्बल 50 लाख 33 हजार इतकी आहे. भाविकाच्या इच्छेनुसार त्याचं नाव गुप्त ठेवण्यात आलंय. भाविक इच्छेनुसार अंबाबाईच्या चरणी देणगी देत असतात. मात्र एका भाविकानं देवीच्या चरणी तब्बल 71 तोळं सोन्याचा सिंह अर्पण केलाय. हा सिंह देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय.

दानपेटीत आतापर्यंत काय काय दान करण्यात आलंय?

अंबाबाईच्या खजिन्यात 1 क्विंटलपेक्षा जास्त सोनं तर 1 टनापेक्षा जास्त वजनाची चांदी

कोट्यावधींचे रत्न, हिरे आणि मोत्यांच्या माळा अर्पण

मे 2023 मध्ये 47 तोळे सोन्याचा मुकूट दान

2017 मध्ये सोन्याच्या देणगीतून 26 किलो सोन्याची पालखी अर्पण

2013-2020 दरम्यान 21 किलो सोनं अर्पण

2013 पूर्वी खजिन्यात 80 किलो सोनं तर 900 किलो चांदी

शिवकालीन कवड्यांच्या माळांचाही यात समावेश

अदिलशाही काळातील दागिन्यांचा समावेश

अंबाबाईच्या चरणी दरवर्षी लाखो भाविक इच्छेनुसार देणगी देत असतात. त्यात आता या 71 तोळ्यांच्या सिंहाची भर पडलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT