kolhapur airport will start flights to tirupati from 31 march 2024  Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur To Tirupati Flight : कोल्हापूर-तिरूपती विमानसेवा मार्चअखेर सुरू हाेणार, जाणून घ्या फ्लाईटची वेळ व दिवस

काेल्हापूरहून तिरुपतीला जाणारी विमानसेवा बंद ठेवल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली हाेती. ही सेवा पुन्हा सुरु करा अशी भाविकांची मागणी हाेती.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur :

गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली कोल्हापूर- तिरुपती विमानसेवा (kolhapur to tirupati flight) पुन्हा सुरू होणार आहे. येत्या 31 मार्चपासून कोल्हापूर तिरुपती विमान सेवा सुरू करण्याचे संकेत विमानतळ प्राधिकरणाने आज (बुधवार) एक्सवर माहिती पाेस्ट करुन दिले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोल्हापूरहून तिरुपती येथे जाण्यासाठी रेल्वे आणि विमानसेवा उपलब्ध हाेती. त्यातील विमानसेवा विशेषत: सातारा, सांगली आणि काेल्हापूर येथील भाविकांसाठी विमानसेवा फायदेशिर ठरत हाेती. (Maharashtra News)

काेल्हापूरहून तिरुपतीला जाणारी विमानसेवा तीन महिन्यांपूर्वी बंद करण्यात आली. यामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली हाेती. ही सेवा पुन्हा सुरु व्हावी यासाठी भाविकांनी लाेकप्रतिनिधी यांच्याकडे मागणी केली हाेती.

दरम्यान आज एक्सवर विमानतळ प्राधिकरणाने कोल्हापूर - तिरुपती विमानसेवा पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत दिले आहेत. येत्या 31 मार्चपासून कोल्हापूर तिरुपती विमान सेवा सुरू होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ही सेवा रविवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी असेल. एक्सवर दिलेल्या माहितीनूसार विमान सकाळी अकरा वाजून दहा मिनीटांनी काेल्हापूरहून तिरुपतीला सुटेल. तसेच तिरुपतीहून काेल्हापूरसाठी दुपारी 12 वाजून 35 मिनीटांनी विमान असेल याची भाविकांनी नाेंद घ्यावी.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण

Chanakya Niti : ज्या व्यक्तीकडे असेल 'ही' अनमोल गोष्ट, त्याला पृथ्वीवरच स्वर्ग मिळेल

Goregaon Mulund Link Road: मुंबई-ठाण्याची वाहतूक कोंडी फुटणार; गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचं काम सुरु; वाचा अपडेट

जयशंकर यांचा एक फोन अन् भारताचं गॅसचं टेन्शन मिटलं; इराणने घेतला सर्वात मोठा निर्णय

Nashik Crime : नाशिकमध्ये नदीत आढळलेल्या मृतदेहाचं गुढ समोर; पत्नीने भाऊ आणि प्रियकराच्या मदतीने रचला कट

SCROLL FOR NEXT