Kolhapur Shirol Bike Dumper Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : कोल्हापुरात भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू; भरधाव डंपरची ३ दुचाकींना जोरदार धडक

Kolhapur Shirol Accident News Update : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथे भरधाव डंपरने तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. भीषण अपघातात चौघांचा मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Alisha Khedekar

  • कोल्हापुरात भरधाव डंपरची तीन दुचाकींना धडक

  • अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू ४ जण गंभीर

  • जखमींवर तातडीने रुग्णालयात उपचार

रणजित माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथे भरधाव डंपरने तीन दुचाकींना मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून, ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हेरवाडहून कुरुंदवाडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने तेरवाड येथील रसवंती गृहाजवळ पुढे जाणाऱ्या तीन दुचाकींना मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, या अपघातात चौघांना आपला जीव गमवावा लागला, तर चार जण गंभीर जखमी झाले.

मृतांमध्ये अब्दुललाट येथील एक महिला आणि एका पुरुषासह अर्जुनवाड येथील दोन तरुणांचा समावेश असल्याची माहिती आहे. अपघातात जखमी झालेल्यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, दुचाकींना धडक दिल्यानंतर डंपर बॅरिकेडला धडकून रस्त्यालगतच्या शेतात जाऊन थांबला. मात्र, अपघातानंतर डंपर चालक वाहन घटनास्थळीच सोडून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. फरार डंपर चालकाचा शोध घेण्यात येत असून, अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Nana Patekar : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृत्यू प्रकरणात गोवा पोलिसांकडून गुन्हा दाखल; कारण काय?

Maharashtra News Live Update: बालाघाटच्या खासदाराच्या गाडीनं भंडाऱ्यात दोघांना चिरडलं

ladki Bahin Yojana : दसरा की दिवाळी? लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

Weather Update : राज्याला उन्हाचा चटका, मुंबईसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज वाचा

Cholesterol : सुका मेवा हृदयासाठी धोकादायक? 'या' ५ सवयींमुळे वाढू शकतो कोलेस्ट्रॉलचा धोका

SCROLL FOR NEXT