महाराष्ट्र

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Kolhapur ₹357.99 Crore 6-Lane Elevated Corridor : कागल शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-48 वर 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि सर्व्हिस रोड बांधण्याचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.

Bharat Jadhav

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-48 (NH-48) वर 6-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या (उन्नत मार्ग) बांधकामाला मंजुरी दिली आहे. यासाठी 357.99 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान नितीन गडकरी यांनी एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएम मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

कागल शहराच्या हद्दीत महामार्गाच्या दोन्ही बाजूंना 3-लेन कॉंक्रीट सर्व्हिस रस्त्यासह हा 6-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे. यामुळे महामार्गावरून जाणारी लांब अंतराची अवजड वाहतूक वरून (एलिव्हेटेड मार्गावरून) जाईल, तर स्थानिक वाहतूक खालच्या सर्व्हिस रोडवरून सुरळीतपणे सुरू राहणार आहे. NH-48 हा दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि चेन्नई यांसारख्या महानगरांना जोडणारा 'गोल्डन क्वाड्रिलॅटरल'चा मुख्य भाग आहे. कागलमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाया जात होते, त्यातून सुटका होईल.

नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये या प्रकल्पाची माहिती दिली आहे. महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरात राष्ट्रीय महामार्ग-48 वर दोन्ही बाजूस 3-लेन कॉंक्रीट सर्व्हिस रस्त्यासह 6-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या बांधकामासाठी 357.99 कोटी रुपयांच्या तरतुदीसह मंजुरी देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग-48 हा भारताच्या गोल्डन क्वाड्रिलॅटरल (GQ) महामार्ग नेटवर्कमधील अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. हा मार्ग दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई या प्रमुख शहरांना जोडतो. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे 5-स्टार एमआयडीसी (MIDC) औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे या भागात व्यापार व उद्योग झपाट्याने वाढत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT