Kokan Politics Saam Digital
महाराष्ट्र

Kokan Politics: दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि कोकणात रविंद्र; भाजपमध्ये प्रवेश करताच ठाकरे गटाच्या नेत्यानं रणशिंग फुंकलं

Kokan Politics News: बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले आमदार सूर्यकांत दळवी यांनी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

Sandeep Gawade

Kokan Politics

लोकसभा निवडणुका तोंडावर असून सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे येत्या 4 फेब्रुवारीला सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. मात्र कोकण दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले आमदार सूर्यकांत दळवी यांनी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश करताच त्यांनी दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र आणि कोकणात रविंद्र असं म्हणत रणशिंग फुंकलं आहे.

२५ वर्ष आम्ही संघर्ष केला आणि आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे. एखादी मुलगी जेव्हा लग्न करून दुसऱ्या घरी जाते तेव्हा काही गोष्टी शिकायला वेळ लागतो. आम्हाला पण या पक्षात काही गोष्टी शिकायला वेळ लागेल. आम्ही वैयक्तिक काही मागणार नाही, पण पक्ष वाढीसाठी जसं शिवसेनेसाठी काम केल तसं भाजपसाठी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान सूर्यकांत दळवी यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

आज पासून जय श्री राम आणि उद्यापासून दापोली मतदारसंघाच्या विकासाचं काम अशी घोषणा देतानाच त्यांनी एक भव्य मेळावा दापोलीत घ्यायचा हे आमच स्वप्न आहे. तसेच दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि कोकणात रविंद्र असतील. कचऱ्याच्या टोपलीत पडलेली अवस्था होत असेल आणि त्याला कोणीतरी हाक मारत असेल तर त्याच स्वागत केलं पाहिजे. भाजपच नेतृत्व चांगल आहे, या प्रवाहात आपण सामील होणे काय गुन्हा आहे. काम करायला वाव मिळेल. दापोलीचा पर्यटन तालुका करण्याकरिता माझ्या मागे उभे राहतील असा विश्वास आहे.

उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून कोकण दौऱ्यावर आहेत. 4 फेब्रुवारीला ते सिंधुदुर्ग आणि 5 फेब्रुवारीला रत्नागिरीत असणार आहेत. रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा असणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र त्याआधीच सूर्यकांत दळवींनी भाजपमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तृतीयपंथी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय प्रतिनिधित्व मिळावे - मैत्री संघटना

Bank Jobs: महत्त्वाची बातमी! जिल्हा मध्यवर्ती बँकेत जिल्ह्यातील तरुणांना प्राधान्य; ७० टक्के जागा राखीव

मोठी बातमी! अ‍ॅडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द, 'ते' वक्तव्य भोवलं|VIDEO

Dakshin Ganga: कोणत्या नदीला 'दक्षिण भारताची गंगा' म्हणतात? जाणून घ्या

हृदयद्रावक घटना ! दोन सख्ख्या बहि‍णींचा बुडून मृत्यू, जेवणापूर्वी हातपाय धुण्यासाठी गेल्या त्या परतल्याच नाहीत

SCROLL FOR NEXT