Nana Patole Controversial Video  Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO : नाना पटोलेंचे पाय धुणारा तो काँग्रेस कार्यकर्ता कोण? तो सध्या कुठे आहे?

Nana Patole Viral Video : कार्यकर्त्याने नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय धुतल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण आहे. कोण आहे हा कार्यकर्ता आणि सध्या तो कुठे आहे? हेच या बातमीतून जाणून घेऊ...

साम टिव्ही ब्युरो

अक्षय गवळी, साम टीव्ही, अकोला प्रतिनिधी

काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय धुतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. यावरच स्पष्टीकरण देत मनात पटोले म्हणाले आहेत की, कार्यकर्ता पाणी टाकत होता आणि मी पाय धूवत होतो. आता याशीच संबंधित एक बातमी समोर आली आहे. नाना पटोलेंचे पाय धुणारा कार्यकर्ता नॉट रिचेबल झालाय.

नानांचे पाय धुणारा कार्यकर्ता विजय गुरव काल रात्रीपासून नॉट रिचेबल असल्याने पुन्हा वेगळीचं चर्चा रंगली आहे. तसेच विजय गुरव नेमका कोठे गेला, असा प्रश्ना काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. 

विशेष म्हणजे विजय गुरव असा या काँग्रेस कार्यकर्त्याचं नाव असून तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी आहे. नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकडून स्वत:चे पाय धुवून घेतल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोमवारी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमानंतर नाना पटोले यांनी वाडेगावात मुक्कामी असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतलंय. यावेळी पालखी दर्शनासाठी थांबलेल्या नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे मोठा चिखल झाला होता. नाना पटेल यांनी चिखलातून मार्ग काढत त्यावेळी संत गजानन महाराजांचा दर्शन घेतलंय. मात्र दर्शनानंतर आपल्या गाडी जवळ आलेल्या नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका कार्यकर्त्यानं धुतलेय.

दरम्यान, नाना पटोले यांच्यावर टीका करत अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी म्हणाले आहेत की, ''कदाचित पालखी सोहळ्याच्या निमित्ताने हा पहिल्यांदाच प्रकार पाहला. नेते अशाच प्रकारे कार्यकर्त्यांना वापरून पाय धुवायला लावत असतील तर निंदाजनक गोष्ट आहे, यातून पक्षाची काय धारना आहे, हे या माध्यमातून दिसून येते. अतिशय संतापजनक हा प्रकार आहे, नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुऊन घेणे, हा कार्यकर्त्यांचा अपमान आहे. नाना पटोलेंनी स्वतःला संत आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे येणार, सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी केला वळता

विहिरीत प्रेमीयुगुलांचा पाण्यात तरंगताना आढळला मृतदेह, पोलिसांना वेगळाच संशय, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: काँग्रेसपाठोपाठ भाजपही घेणार पक्षाच्या कामगिरीचा आढावा

Pravin Tarde : प्रवीण तरडेंनी 'देऊळ बंद २'चं शूटिंग थांबवले अन् रिलीज डेटही पुढे ढकलली, कारण काय?

Divorce: घटस्फोटानंतर दुग्धाभिषेक, केक कापला; जंगी सेलिब्रेशन करणारा तरुण आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT