Marathwada Politics Saam Tv
महाराष्ट्र

Marathwada PoliticsPolitics: जरांगेंविरोधात भाजपची मराठा खेळी? जाणून घ्या मराठवाड्यासाठी BJP चा स्पेशल फॉर्म्युला

Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणूकीत भाजपला जरांगे फॅक्टरचा मोठा फटका बसल्याने आता सावध झालेल्या भाजपने मराठवाड्यासाठी नवी रणनीती आखलीय.. मात्र भाजपची ही रणनीती काय आहे? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Satish Kengar

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक जाहीर होताच मनोज जरांगेंनी भाजपचा पराभव करण्याचा इशाराच दिलाय. त्यापार्श्वभूमीवर भाजपने जरांगे फॅक्टरला निष्प्रभ करण्यासाठी मराठवाड्यातून सर्वाधिक मराठा उमेदवार रिंगणात उतरवण्याची योजना आखलीय. तर मराठवाड्यासाठी भाजपने स्पेशल 16 फॉर्म्युला तयार केलाय.. हा फॉर्म्युला नेमका काय आहे? जाणून घेऊ...

भाजपचा स्पेशल 16 फॉर्म्युला काय?

भाजप मनोज जरांगेंचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्वाधिक मराठा उमेदवार देणार. भाजपकडून 16 पैकी 10 मराठा तर 2 ओबीसी आणि 1 जैन उमेदवार जाहीर करण्यात आलेत. मराठा समाजासाठीच्या योजना प्रचारात आक्रमकपणे मांडणार.

लोकसभा निवडणूकीत जरांगे फॅक्टरचा भाजपला जोरदार फटका बसला. त्यामुळे सावध झालेल्या भाजपने पहिल्या यादीतच तब्बल 16 पैकी 10 मराठा उमेदवारांना संधी दिलीय.. हे उमेदवार कोण आहेत? जाणून घेऊ...

मराठवाड्यात भाजपची मराठा खेळी?

  • अनुराधा चव्हाण, फुलंब्री

  • संतोष दानवे, भोकरदन

  • बबनराव लोणीकर, परतूर

  • अभिमन्यू पवार,औसा

  • संभाजी पाटील निलंगेकर, निलंगा

  • राणाजगजितसिंह पाटील, तुळजापूर

  • तानाजी मुटकुळे,हिंगोली

  • मेघना बोर्डीकर, जिंतूर

  • राजेश पवार, नायगाव

  • श्रीजया चव्हाण, भोकर

2019 च्या लोकसभेत मराठवाड्यात भाजपने 4 जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदाच्या जरांगे फॅक्टरमुळे हा आकडा शुन्यावर आला. मात्र सध्या मराठवाड्यातील 46 जागांपैकी मराठा आमदारांचं पक्षनिहाय संख्याबळ नेमकं कसं आहे? जाणून घेऊ...

मराठवाड्यातील मराठा आमदारांचं संख्याबळ

भाजप- 10

शिंदे गटाचे आमदार- 4

उद्धव ठाकरे- 2

काँग्रेस - 5

अजित पवार- 4

शरद पवार- 1

मनोज जरांगेंनी भाजपच्या उमेदवारांना पाडण्याचा इशारा दिलाय.. त्यामुळे सर्वाधिक मराठा उमेदवार देऊन भाजपने जरांगे फॅक्टरवर घाव घातलाय. मात्र भाजपच्या मराठा खेळीने जरांगे फॅक्टर निष्प्रभ होणार का? आणि मराठा समाजाला झुकतं माप दिल्यास इतर समाजाची नाराजी भोवणार का? याची उत्सुकता आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT