Who Is Manoj Jarange Patil 
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे कोण आहेत?

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील गेल्या ७ दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसले आहेत. आतापर्यंत अनेक बड्या नेत्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे.

Vishal Gangurde

Who Is Manoj Jarange Patil

जालन्यातील लाठीमार प्रकरणानंतर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे चांगलेच चर्चेत आले आहे. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील गेल्या ७ दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसले आहेत. आतापर्यंत अनेक बड्या नेत्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे यांच्यासोबत सेल्फी घेण्याची क्रेझ

मनोज जरांगे यांचं गेल्या ७ दिवसांपासून आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरू आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात जरांगे यांचं उपोषण सुरू आहे. जरांगे यांना आतापर्यंत शरद पवार, उद्धव ठाकरे, गिरीश महाजन, राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे.

अनेकांनी जरांगे यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. याचबरोबर अतंरवाली सराटीमधील अनेक गावकरी जरांगे पाटील यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी येत आहेत. संपूर्ण राज्यात चर्चेत असलेले जरांगे पाटील वारंवार भाषण केल्यामुळे त्यांना घसा दुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे ते आराम करताना दिसत आहेत. मात्र तरीही अनेकांना त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरताना येत नाहीये.

मनोज जरांगे कोण आहेत?

जालन्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात होत आहे. जरांगे पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आंदोलनाच्या चळवळीत सक्रिय आहेत. मनोज जरांगे पाटील यांचं १२ वी पर्यंत शिक्षण झालं आहे. सुरुवातीच्या काळात मनोज जरांगे पाटील यांनी हॉटेलमध्येही काम केलं.

मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्याचे आहेत. ते मागील काही वर्षांपासून अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे स्थायिक आहेत. जरांगे पाटील गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी पूर्णवेळ काम करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : बुधवारी नशिबाची साथ, अडकलेली कामे होणार पूर्ण; कोणत्या राशींना मिळणार धनलाभ?

Maharashtra School Holidays: शाळांच्या दिवाळी सुट्टीचे वेळापत्रक जाहीर; शिक्षण विभागाचे परिपत्रक जारी

Manoj Jarange Patil: 'मराठ्यांविरोधात जाणाऱ्यांना 2029ला पाडणार'; जरांगे पाटलांचा नारायणगडावरुन इशारा

'शिंदेंनी माझ्या नावे भाजपकडून 500 कोटी घेतले का?'दसरा मेळाव्यातून मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Who is Justice Shrihari Davare: उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांचा शिवसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या हाती घेतला धनुष्यबाण

SCROLL FOR NEXT