workers agitation near kisanveer sugar factory gate saam tv
महाराष्ट्र

Bhuinj: २२ महिन्यांच्या पगारासाठी ४०० कामगारांचा 'किसनवीर' पुढं ठिय्या

आज कामगारांनी नाईलाजास्तव आंदाेलन केल्याचे सांगितले.

ओंकार कदम

सातारा : सातारा (satara) जिल्ह्यातील भुईंज (bhuinj) येथील किसनवीर सहकारी साखर कारखानामधील (kisanveer sugar factory) कामगारांना २२ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने आज (साेमवार) त्यांनी कारखान्याचे गेट समाेर ठिय्या आंदाेलन पुकारले आहे. या आंदाेलनात सुमारे ४०० पेक्षा अधिक कामगार सहभागी झाले आहेत. (kisanveer sugar factory latest marathi news)

भुईंज येथील हा कारखाना (sugar factory) गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे यावर्षी गाळप सुद्धा हाेऊ शकलेले नाही. परिणामी या कारखान्यातील कामगारांना गेल्या बावीस महिन्यांपासून पगार मिळालेला नाही.

त्यामुळे कामगारांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारा बाहेर आक्रोश आंदोलन सुरू केले आहे. या आंदाेलनात सुमारे ४०० कामगार सहभागी झाले आहेत. यावेळी कारखान्यातील ज्येष्ठ कामगार म्हणाले माजी आमदार आणि विद्यमान अध्यक्ष मदन भाेसले (madan bhosale) आजही हा कारखाना चालावा यासाठी आणि आमच्यासाठी प्रयत्न करीत आहेत हे आम्हांला माहिती आहे. परंतु आमची सहनशिलता संपली आहे. वाढत्या महागाईमुळे आमचे कुटुंब आता त्रस्त झाले आहे. त्यामुळे आज कारखान्यासमाेर आंदाेलन छेडावे लागले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT