Kirit Somaiya Saam Tv
महाराष्ट्र

Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्यांच्या कार्यालयातच घोटाळा; साडेसात लाखांची फसवणूक

श्रवणयंत्र वाटपावेळी तब्बल साडेसात लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कार्यालयात घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रवणयंत्र वाटपावेळी तब्बल साडेसात लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे. (Latest Kirit Somaiya News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमधील मुलूंड परिसरात किरीट सोमय्या यांचे एक कार्यालय आहे. या कार्यालयात हा प्रकार उघडकीस आलाय. या कार्यालयात 'ऐका स्वाभिमानाने' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमांतर्गत नागरिकांना श्रवणयंत्र वाटप करण्यात येत होते. मात्र यातील दोन व्यक्तींनी श्रवणयंत्र वाटप न करता गायब केले. हा प्रकार लक्षात येताच कार्यालय प्रमुखांनी पोलिसात धाव घेतली. या दोन्ही व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रफु्ल्ल कदम असं कार्यालय प्रमुखाच नाव आहे. गुरुवारी त्यांनी नवघर पोलिस ठाण्यात दोन व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली होती. प्रज्ञा जयंत गायकवाड आणि श्रीकांत रमेश गावित या दोघांविरोधात पोलिसांनी आलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी ७ लाख ३६ हजार रुपयांचा अपहार केल्याची प्राथमिक माहिती आहे.

'युवक प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट' ही किरीट सोमय्या यांची एक संस्था आहे. या संस्थेमार्फत महागडे श्रवणयंत्र गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांना ५०० रुपयांमध्ये दिले जाते. किरीट सोमय्या हे नेहमीच नेते मंडळी आणि त्यांनी केलेले घोटाळे बाहेर काढत असतात. आता चक्क त्यांच्याच कार्यालयात हा घोटाळा झाल्याने सर्वत्र या विषयी चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi- Donald Trump: PM मोदींसमोरच डोनाल्ड ट्रम्प यांचं ठोस आश्वासन; म्हणाले, भारतावर हल्ला झाल्यास आम्ही त्यांच्यासोबत...

Operation Manjar: ऑपरेशन टायगरनंतर महाराष्ट्रात सुरू होणार 'ऑपरेशन मांजर', एकनाथ शिंदेवर मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Update: पुणे महापालिकेत काँग्रेसचे आंदोलन, पाणी कपात अयोग्य असल्याचा आरोप

Shocking: व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत महिला पोलिसाची आत्महत्या, धावत्या ट्रेनसमोर मारली उडी

Dahisar Tourism : दहिसरजवळील ५ 'सीक्रेट' पिकनिक स्पॉट्स, वीकेंड होईल एकदम खास

SCROLL FOR NEXT