किरीट सोमय्या राजकारणातले 'आयटम गर्ल'; मलिकांची जहरी टीका
किरीट सोमय्या राजकारणातले 'आयटम गर्ल'; मलिकांची जहरी टीका Saam TV
महाराष्ट्र

किरीट सोमय्या राजकारणातले 'आयटम गर्ल'; मलिकांची जहरी टीका

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

मुंबई: किरीट सोमय्या गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढत आहेत. काल किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी चक्क मंत्रालयात जाऊन फाईल बघितल्याने खळबळ उडाली होती. मंत्रालयातील नगर विकास खात्याच्या कार्यालयात जाऊन किरीट सोमय्या काही फाईली तपासत असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. मंत्रालयात जाऊन त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल बघितल्या मुळे. सोमाय्या यांनी कुठल्या अधिकारात फाईल बघितल्या तसेच अधिकार्‍यांनी कोणत्या अधिकारात फाईल दाखवल्या याबाबत चर्चा मंत्रालयात सुरू होती.

त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले होते. काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी हा गोष्टीची चौकशी करावी अशी मागणी केली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आता सोमय्यांवरती जहरी टीका केली होती. किरीट सोमय्या म्हणजे राजकारणातील आयटम गर्ल आहे. एकादा चित्रपट चालण्यासाठी ज्याप्रकारे आयटम गर्ल लागते त्याप्रमाणे राजकारणात किरीट सोमय्या आहेत. काल झालेल्या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. त्याच अनुषंगाने नगर विकास खात्यातील तीन अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून भाजपचे माजी खासदर किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते अनिल पबर, राष्ट्रवादीचे हसन मुश्रिफ, अजित पवार, मिलींद नार्वेदकर यांच्यावर पत्रकार परिषद घेवून गंभीर आरोप केले होते. जरंडेश्वर साखर कारखाना, तसेच हसन मुश्रिफांचा कारखाना यात घोटाळा झाल्याचे गंभीर आरोप सोमय्यांनी या अगोदर केले आहेत. त्यामुळे आता थेट नगर विकास खात्याच्या मंत्रालयात जाऊन फाईली तपासल्याने कोणाचा नंबर लागणार या चर्चा होऊ लागल्या आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup 2024: पाकिस्तानचा संघ टीम इंडियावर भारी पडणार? IND vs PAK सामन्याबाबत बोलताना हरभजन सिंग काय म्हणाला?

World Hypertension Day: World Hypertension Day 2024: जगभरात जागतिक उच्च रक्तदाब दिन का साजरा करतात? जाणून घ्या

Today's Marathi News Live : रत्नागिरीत सीएनजीचा मोठा तुटवडा

Sanjay Raut: निवडणुकीनंतर सुपारीची दुकानं बंद होणार; PM मोदी- राज ठाकरेंच्या सभेवरुन संजय राऊतांची बोचरी टीका

Pune Accident News: पुण्यात भीषण अपघात! भरधाव कंटेनर उलटला, दोघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT