Kirit Somaiya Dapoli Visit Saam Tv
महाराष्ट्र

Kirit Somaiya Dapoli Visit: दापोलीला छावणीचे स्वरुप, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसाॉर्टवर कारवाईची मागणी सोमय्यांनी केलीये.

अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी

रत्नागिरी: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या दापोली दौऱ्यामुळे दापोलीला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसाॉर्टवर कारवाईची मागणी सोमय्यांनी केलीये. त्यासाठी आज ते प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीकडे रवाना झाले आहेतirit Somaiya Headed Towards Dapoli Big Police Bandobast Deployed).

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) दापोलीत येणार असल्याने तिथे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दापोलीलत मोठा पोलीस बंदोबस्त (Police Bandobast) तैनात करण्यात आला आहे. यासंबंधित पोलीस अधिक्षक मोहित कुमार गर्ग यांनी अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेतलीय

दापोलीला पोलीस छावणीचे स्वरुप

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील अनिल परब (Anil Parab) यांच्या बेकायदेशीर रिसॉर्टवर हातोडा मारुया, म्हणत माजी खासदार किरीट सोमय्या दापोली दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दापोलीला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

किरीट सोमय्यांना दापोलीत रोखून धरण्याची धमकी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी दिल्याने भाजपा आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दापोलीत गोंधळ होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT