Kirit Somaiya Uddhav Thackeray, Kirit Somaiya latest Marathi news, Kirit Somaiya on Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरेंनी धर्म, संस्कृती, हिंदुत्व गहाण ठेवलं: सोमय्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कथित १९ बंगल्याबाबत याचिका दाखल करणार असल्याचे साेमय्यांनी स्पष्ट केले.

साम न्यूज नेटवर्क

- राजेश भाेस्तेकर

रायगड : सकाळी पावणे पाच वाजता भोंगे (loudspeaker) लावले तर नियम मोडत नाही आणि सायंकाळी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावली तर भंग होतो, हा कुठचा न्याय, असा सवाल भाजप (bjp) नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान हनुमान चालीसाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हे राजकारण करीत असल्याचा आरोप सोमय्या यांनी अलिबाग येथे केला आहे. (Kirit Somaiya latest Marathi news)

किरीट सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी आपला धर्म, संस्कृती, हिंदुत्व गहाण ठेवले आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर घोटाळ्यामुळे कारवाई होत आहे आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी आपले तत्व गहाण ठेवले आहे.

दरम्यान, मुरुड तालुक्यातील कोर्लई गावातील मुख्यमंत्री ठाकरेंच्या नऊ एकर जमिनीवरील कथित १९ बंगल्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहाेत. या प्रकरणात खरी वस्तुस्थिती न्यायलयामार्फत जनतेसमोर येईल, असा दावा साेमय्यांनी केला आहे. यावेळी सोमय्या यांचे वकील अॅड किरण कोसमकर, अॅड अंकित बंगेरा, अॅड अमित देशमुख, अॅड सुहास कारूळकर, अॅड श्रीराम ठोसर, अॅड. अभिषेक सावंत, श्रीविष्णू शशीधरण, निखिल चव्हाण, अॅड मिलिंद साळावकर, अॅड् वैशाली बंगेरा हे उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशोक खरातला ३ दिवसांची पोलीस कोठडी

India Russia Deal 2026: ३००० सैनिक, ५ युद्धनौका अन्...; भारत-रशियामध्ये मोठा लष्करी करार, पाकिस्तानची चिंता वाढली

FASTag पासच्या नावाखाली होतेय फसवणूक, एका चुकीमुळे होईल अकाउंट रिकामं; NHAI ने केलं अलर्ट

Face Fat Yoga: हनुवटी आणि गळ्यावरची चरबी ७ दिवसात करा कमी रोज फक्त १० मिनिट करा 'हा' फेस योगा

Heart Attack Women: सावधान! हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभरआधी महिलांमध्ये दिसतात ही सामान्य लक्षणं, दुर्लक्ष करणं ठरेल घातक

SCROLL FOR NEXT