kirit somaiyaa ajit pawar 
महाराष्ट्र

जसं संजय राऊत वागले तसं अजित पवार करणार का? किरीट सोमय्या

विश्वभुषण लिमये

साेलापूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मित्र परिवाराकडून १८४ कोटींचे इनामी व्यवहार इडीच्या छाप्यात सापडली आहे. शिवाजी व्हेन्चर प्रायव्हेट लिमिटेड इंडो प्रायवेट लिमिटेड कोणाची? असा प्रश्न भाजप नेते किरीट साेमय्या यांनी उपस्थित करुन या दोन्ही कंपन्यांनी अजित पवारांना दहा वर्षांपूर्वी शंभर कोटी दिले होते असा दावा केला आहे. दरम्यान खासदार संजय राऊत यांनी चोरीचा माल परत केला तसा उपमुख्यमंत्री अजित पवार परत करणार आहेत का ? असा प्रश्न सोमय्यांनी केला आहे. kirit-somaiya-ajit-pawar-jarendeshwar-sugar-factory-enforcement-directorate-sml80

किरीट साेमय्या म्हणाले अजित पवार यांच्या भगिनी नीता पाटील, विना पाटील आणि मेहुणे मोहन पाटील यांचा जरंडेश्वर साखर कारखान्यापासून विविध कंपन्यात भागिदारी आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या बहिणींशी बेईमानी केली की महाराष्ट्रातील जनतेशी बेईमानी केली याचे उत्तर द्यावे.

दरम्यान अजित पवार यांच्यावर केलेल्या सर्व आरोपांचे पुरावे इडी आणि आयकर खात्यास पाठवणार आहे. हे पुरावे खोटे असल्याचे खासदार शरद पवार यांनी सिद्ध करावे असे आव्हान सोमय्यांनी शरद पवार यांना दिले आहे.

साेमय्या पुढं म्हणाले खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार, पार्थ पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी आरोप खोटे असल्याचे सिद्ध करावे. पवार कुटुंबीय जनतेला लुटण्याचे काम करत आहे. त्यांना उघडे पडण्याचे काम मी करतोय असेही सोमय्यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा पेण मतदार संघावर दावा

बारामती MIDC मध्ये गोळीबाराचा थरार; उद्योजकाच्या कार अज्ञातांकडून फायरिंग

कुठे घोड्यांची शर्यत, कुठे विदेशी मासे; पुण्यातील पेटोपियात नेमकं काय सुरू आहे? VIDEO

प्रसिद्ध मॉडेल बलात्कार प्रकरणात मुंबईतील उद्योजकाला दिलासा; न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

Sleep Health : पूर्ण झोप घेऊनही सकाळी थकवा जाणवतोय? ही आहेत 6 धक्कादायक कारणे!

SCROLL FOR NEXT