King Cobra Snake Video लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

Cobra Snake Viral Video: बाप रे बाप! शाळेत आला कोब्रा साप; विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही उडाला थरकाप

King Cobra Snake In School: जालन्यातील नळविहीरा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या एका वर्गखोलीत कोब्रा हा विषारी साप आढळून आल्यानं खळबळ उडाली.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

King Cobra Snake In School:  साप म्हटलं अनेकांना धडकी भरते. सापाचं नुसतं नाव ऐकलं तरी अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यात तो साप जर जगातला सर्वात विषारी साप, म्हणजे किंग कोब्रा असेल कर मग विचारायलाच नको. जालना जिल्ह्यातल्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेत असाच विषारी कोब्रा साप आढळला आणि सर्वांचाच थरकाप उडाला. (Jalna Latest News)

जालना जिल्ह्यात (Jalna) एका शाळेत हा थरकाप उडवणारा प्रकार घडला आहे. दिवाळीच्या सुट्ट्यानंतर शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी जालन्यातील नळविहीरा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या एका वर्गखोलीत कोब्रा (King Cobra Snake) हा विषारी साप आढळून आल्यानं खळबळ उडाली. वर्गखोलीतील फरशीच्या मोकळ्या जागेत हा साप फणा काढून बसलेला होता.

वर्गखोलीत साप आढळून येताच शिक्षकांनी सावध पवित्रा घेत सर्पमित्राला बोलावलं. काही वेळेतच सर्पमित्राने या सापाला वर्गखोलीच्या बाहेरील मोकळ्या जागेत आणून एका बरणीत बंद केलं. नंतर सापाला त्याला जंगलात सोडलं आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

पाहा थरारक व्हिडिओ -

नागराज किंवा किंग कोब्रा हा भारतातील पुर्व आणि दक्षिण भागात आढळणारा दुर्मिळ साप आहे. हा नावाप्रमाणेच नागराज आहे. विषारी सापांमध्ये लांबीला सर्वाधिक आणि विषाच्या प्रभावात नागापेक्षा कमी परंतु मात्रा मोठी असल्याने फार धोकादायक. याच्या विषाने माणूस अर्ध्या तासाच्या आत मरू शकतो. याचा फणा नागांपेक्षा छोटा असतो आणि डिवचला गेला असता तो ३ ते ४ फूट उंच फणा उभारतो.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: पैसा कमवायचा आहे? चाणक्यांनी सांगितलेल्या या ६ गोष्टी आधी शिका, नशीब देईल आपोआप साथ

'हा खरा 'धुरंधर' चित्रपट! बजेट 1000 कोटी, कमाई 2500 कोटी तरीही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण ऑस्कर जिंकले सहा

Maharashtra Live News Update: अंबादास दानवे यांना पोलीस संरक्षण द्या परभणीतील उबाठा शिवसेनेकडून जिल्हाधिकारी आणि एसपींकडे मागणी

LPG Cylinder: गॅस सिलिंडरबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, eKYC चं टेन्शन मिटलं; पण...

भाजपने डाव टाकला, ममता बॅनर्जी चक्रव्यूहात अडकल्या? नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT