चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा खून; 6 तासात पोलिसांनी केली आरोपीला अटक अविनाश कानडजे
महाराष्ट्र

चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा खून; 6 तासात पोलिसांनी केली आरोपीला अटक

संशयाच्या कारणावरुन एका विवाहीतेचा तिच्या पतीने धारदार शस्त्राने डोक्यावर वार करुन निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अविनाश कानडजे

औरंगाबाद : संशयाच्या कारणावरुन एका विवाहीतेचा तिच्या पतीने धारदार शस्त्राने डोक्यावर वार करुन निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री पैठण (Paithan)- औरंगाबाद (Aurangabad) रस्त्यावरील दुध शित केंद्राजवळ घडली आहे. याप्रकरणी पैठण पोलिसांनी (police) पतीसह त्याच्या मित्राला अटक (Arrested) केली आहे. अनिता अशोक मुकुटमल असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. (killed wife on suspicion of character husband arrested)

हे देखील पहा-

पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपी (Accused) अशोक मोहनराव मुकुटमल यांचे मयत अनिता मुकुटमल सोबत २० वर्षापुर्वी लग्न झाले होते. त्यानंतर मुल बाळ न झाल्याने अशोक याने १० वर्षापुर्वी दुसरे लग्न (married) केले आणि तो वेगळा राहु लागला. तर मयत अनिता ही सासरीच राहत होती. तिने सासरी राहु नये, सासरचे घर सोडुन दयावे यासाठी आरोपी अशोक तिच्यावर संशय घेवून अधुन- मधुन तिच्यासोबत वाद करत होता.

तु जर गेली नाही तर एक ना एक दिवस तुझा काटा काढेन असे म्हणुन धमकावत होता. तसेच तिच्याकडे आल्यावर तिच्यावर संशय घेवुन तिच्यासोबत वाद घालायचा. मयत अनिता अजंठा फार्मा कंपनी, एम.आय.डी.सी. पैठण येथे काम करत होते. तु कंपनीत कामाला जावु नको, असे म्हणुन आरोपीने तिला मारहाण केली होती. त्यानंतर रविवारी मध्यरात्री पैठण- औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या संस्कृती हुर्डा पार्टीच्या जवळ तिच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन तिचा खुन केला असल्याची फिर्याद मयताच्या भावाने दिली होती. त्यानुसार पोलीसांनी पती अशोकसह त्याच्या मित्राला ताब्यात घेऊन तपसाअंती दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

SCROLL FOR NEXT