accident news, solapur saam tv
महाराष्ट्र

Solapur Accident : आजाेबांच्या डाेळ्यांदेखत नातवाचा ट्रकच्या चाकाखाली मृत्यू; आठवड्यातील दुसरी घटना

सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी झाली हाेती.

विश्वभूषण लिमये

Solapur Accident News : सोलापूर (Solapur) शहरात पुन्हा एकदा जड वाहतुकीने एका तीन वर्षीय चिमुकल्याचा बळी घेतला आहे. सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील वालचंद महाविद्यालय (walchand college) परिसरात ट्रकच्या (truck) चाकाखाली चिमुकला आल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. (Breaking Marathi News)

अक्कलकोट तालुक्यातील कर्जाळ गावातील असद अल्ताफ बागवान (Asad Bagwan) असे मृत पावलेल्या बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे असदचे आजाेबा (सरदार बाबू बागवान) यांनी जागेवरच हंबारडा फाेडला. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीत कैद (CCTV Camera) झाली आहे. सोलापुरात एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना घडल्याने नागरिकांमधून (Citizens) संताप व्यक्त केला जात आहे.

सोलापुरात तीन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज (chhatrapati sambhaji maharaj) चौकात जड वाहनाच्या धडकेत एका दहा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच ही दुसरी धक्कादायक घटना (incident) घडली आहे. यामुळे सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात (Solapur Civil Hospital) नातेवाईकांनी गर्दी करत संताप व्यक्त केला आहे. पोलीस ट्रक चालकाचा शाेध घेताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakshabandhan 2025: रक्षाबंधनात ओवाळणीच्या ताटात कोणत्या गोष्टी ठेवणे शुभ मानले जाते?

ITBP Bus Accident: धक्कादायक! जवानांची बस नदीत कोसळली, क्षणात झालं होत्याचं नव्हतं|VIDEO

Maharashtra Live News Update: पंढरपूर वरून परत ठेऊन संत गजानन महाराज यांची पालखी शेवटच्या टप्प्यात पोहोचली

Parbhani Crime : परभणीत खळबळ; मध्यवस्तीत आढळला महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याचा संशय

Shocking News: नूडल्स खाणाऱ्यांनो सावधान! पाकिटामध्ये आढळली मेलेली पाल; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT